डॉ. सतीश ससाणे यांची समाजशास्त्र अभ्यास मंडळ सदस्य पदी निवड

डॉ. सतीश ससाणे यांची समाजशास्त्र अभ्यास मंडळ सदस्य पदी निवड

अहमदपूर ( गोविंद काळे ) : येथील महात्मा फुले महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ.सतीश गंगाराम ससाणे यांची न्यायमूर्ती तात्यासाहेब आठल्ये ( ऑटोनॉमस )कॉलेज, देवरुख जिल्हा रत्नागिरी येथे समाजशास्त्र अभ्यास मंडळाच्या सदस्यपदी नुकतीच निवड झाली.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,समाजशास्त्राचे संशोधक तथा अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून डॉ.सतीश ससाणे यांची ओळख आहे. न्यायमूर्ती तात्यासाहेब आठल्ये कॉलेजच्या समाजशास्त्र अभ्यास मंडळाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाची प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांनी डॉ. ससाणे यांचा यथोचित सत्कार करून अभिनंदन केले.

या सत्कार कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ.दुर्गादास चौधरी यांनी केले तर ; आभार डॉ. बब्रुवान मोरे यांनी मानले. यावेळी प्रोफेसर डॉ. अनिल मुंढे, डॉ .पांडुरंग चिलगर, डॉ.मारोती कसाब,डॉ. संतोष पाटील,कार्यालय प्रमुख प्रशांत डोंगळीकर, चंद्रकांत शिंपी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!