माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांचा उदगीर दौरा विविध सामाजिक उपक्रमांनी संपन्न

माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांचा उदगीर दौरा विविध सामाजिक उपक्रमांनी संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आ. बच्चुभाऊ कडू हे उदगीर दौऱ्यावर आले असता उमा चौक येथे महिला आघाडी कार्यालयास भेट व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार त्याच्या हास्ते करण्यात आला. तर भागीरथी मंगल कार्यालय येथे प्रहार जनशक्ती पक्ष उदगीर व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग साहित्य वाटप आयोजित कार्यक्रमात 50 दिव्यांग बांधवांना माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू व जिल्हाप्रमुख राजाभाऊ चौगुले, उपजिल्हाप्रमुख विनोद तेलंगे व उदगीर तालुका प्रमुख रवी किरण बेळकुंदे यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना ट्राय सायकल, व्हीलचेअर, मोठी व्हीलचेअर, छोटी विशेष अंधकाठी, कानाची मशीन, मोबाईल, मतिमंद किट ,छोटे वाकर, दिव्यांग बांधवांना अनेक प्रकारचे साहित्य वाटप करण्यात आले.

बच्चुभाऊ कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर पक्ष प्रवेश करण्यात आला. दिव्यांग बांधव व पक्ष पदाधिकारी यांच्यासोबत आ. बच्चूभाऊ कडू यांनी सुसंवाद साधत अमूल्य मार्गदर्शन केले. या प्रसंगी माधव मोतीपवळे तालुका उपाध्यक्ष यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी दिव्यांगाच्या साहित्यासाठी उपजिल्हाप्रमुख विनोद तेलंगे व उदगीर तालुका प्रमुख रवी किरण बेळकुंदे यांनी दिव्यांगच्या मागनीअनुसार प्रयत्न करून 50 दिव्यांग बांधवाना साहित्य मिळऊन दिले. कार्यक्रम संपन्न होण्यासाठी जिल्हाप्रमुख राजाभाऊ चौगुले ,उपजिल्हाप्रमुख विनोद तेलंगे ,ग्रामीण जिल्हाप्रमुख कांचनताई भोसगे, उपजिल्हाप्रमुख प्रेमलताताई भंडे, उदगीर तालुकाप्रमुख रविकिरण बेळकुंदे, प्रहार महिला आघाडी तालुकाध्यक्ष विजयमाला पवार , नवनिर्वाचित शहराध्यक्ष जयश्रीताई पाटील,शकुंतला रोडेवाड ,रचना हल्लाळे,कुमुदिनी पांचाळ,सुजाता दावरे ,विधानसभा अध्यक्ष-सुर्यभान चिखले, तालुका उपाध्यक्ष महादेव मोतीपवळे, शहर सचिव बालाजी बिरादार ,तालुका कार्याध्यक्ष महादेव आपटे, तालुका संघटक आनंद गव्हाणे, तालुका संपर्कप्रमुख सुनीलजी केंद्रे, शहर मार्गदर्शक बंडेप्पा पडसलगे, कार्याध्यक्ष गणेश दावणे, उमेश जाधव ,अजय कासले,सोपान राजे, बळीराम चौधरी, अविनाश शिंदे, चांदपाशा शेख नांदेड जिल्हा संघटक ,संदीप पवार इत्यादी उपस्थित होते.सूत्रसंचलन उदगीर प्रहार चे मार्गदर्शक बंडेप्पा पडसलगे ,तर आभार प्रदर्शन सुनिलजी केंद्रे यांनी केले .

About The Author

error: Content is protected !!