रुग्णांची सेवा करणे नैतिक जबाबदारी आहे – डॉ विनायकराव पाटील

रुग्णांची सेवा करणे नैतिक जबाबदारी आहे - डॉ विनायकराव पाटील

देवणी (प्रतिनिधी) : शहरात एकमेव दातांच्या दवाखान्याचे शानदार उद्घाटन संपन्न झाले या प्रसंगी डॉ. विनायक पाटील यांनी सांगितले की, चाळीस वर्षे पासुनची डॉक्टर सेवा मुंबई शहरात मोठे नाव लौकिक कमावले जे.जे.हाॕस्पिटल मध्ये सेवा केली. एक मनात निश्चित केले कि आपण ग्रामीण भागात मोठा दवाखाना करण्यासाठी प्रयत्न केला. आणि देवणी शहरात डॉ विनायकराव पाटील मल्टीस्पेशालिटी हाॕस्पिटल देवणी येथे माझ्या स्वताच्या मुलाने मोठा दवाखाना देवणीत सुरू करून चांगली सेवा करत आहे. आपण गौंडगाव विजयनगर येथे जिल्हा परिषद प्राशालेत शिक्षण घेऊन डॉ बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. म्हणून घेतलेल्या शिक्षणाचा योग्य वापर करून कर्तव्य सिद्ध केल्यास यश नक्कीच यश मिळत असते. देवणी तालुक्यात काही गोष्टी नव्यानेच निर्माण होत असतात. त्यापैकी दातांचा दवाखाना पहिला होत आहे. यांची भरभराटी होऊन एक मोठं हॉस्पिटलमध्ये रूपांतर व्हावं, ग्रामीण भागातील व देवणी सीमावर्ती भागात असल्याने कर्नाटक व महाराष्ट्र अशा दोन राज्याची सेवा घडावी. अशा शुभेच्छा डॉ प्रसाद यांना दिल्या. याप्रसंगी काँग्रेस नेते अभय साळुंखे, विनायकराव पाटील हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. विनायक पाटील, डॉ. अविंद्र भातम्बरे, नागेश जीवने ,अनिल कांबळे,प्रा.डॉ. अनिल इंगोले, रेवण मळभागे , प्राचार्य निळकंठ बोडके,प्रा,सुर्याजी बोडके,डॉ. प्रसाद बोडके, सुधिर पाटील,पत्रकार रणदिवे लक्ष्मण,विठ्ल बोडके,राजकुमार गरड,रमांकात पाटील,व्यंकट शिंदे,भाऊसाहेब सुरवसे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. देवणी परिसरातील युवक, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश माने यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!