लातूर जिल्ह्यात 1663 कोरोनाबाधित ; तर 18 रुग्णांचा मृत्यु
जिल्ह्याने ओलांडला 50 हजारांचा टप्पा
लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील 35493 रुग्ण उपचाराने आजपर्यंत बरे झाले आहेत. आज नवीन 1663 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे असे प्रशासनाने जाहीर केले आहे.
लातूर जिल्ह्यात 1588 आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 577 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. तसेच प्रलंबित मधील 105 कोरणा बाधित रुग्ण आढळून आले आहेत. 3431 रॅपीड अॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 981 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 50190 झाली आहे. उपचार घेत असलेल्या 13858 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 839 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 35493 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 775 आहे. आरटिपीसीआर मधील 296 अहवाल प्रलंबित आहेत.