गुटखा विक्रीतून व्हावे वाटले मालामाल! जवळपास तीन लाखाचा ऐवज पकडला काल!!
शिरुर अनंतपाळ (कैलास साळूंके/किशोर सुरशेट्टे) : परिसरात काही हौशी कलाकार विनापरवाना मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री करून मालामाल होण्याची स्वप्न पाहत आहे. काही प्रमाणात यशस्वी झाले असतील देखील! मात्र शिरुर अनंतपाळ पोलिसांनी अशा पद्धतीच्या गुटखा विक्री करणाऱ्या तरुणांना रंगेहात पकडून मुद्देमालासह जप्त करण्याचा सपाटा चालवला आहे. लॉक डाऊन च्या काळात सर्व प्रकारचे दुकाने बंद ठेवण्यात आले होते, मात्र महाराष्ट्रात बंदी घालण्यात आलेला गुटखा, शिरुर अनंतपाळ तालुक्यात येणार असल्याची माहितीनुसार सापळा रचण्यात आला होता.
दि. 13/04/2020 रोजी एक संशयीत कार भरधाव वेगात जात असताना शिरुर अनंतपाळ पोलीसांनी ताब्यात घेऊन गाडीची तपासणी करताना गाडी मध्ये महाराष्ट्र राज्यात बंदी असलेला विमल पान मसाला 24 बॅग व तंबाखू 24 बॅग असे अंदाजे एकूण 185760 रूपये किमतीचा माल व इंडीका कार 100000 असे एकूण 285760 रूपयाचा माल जप्त करून आरोपी 1) रामलिंग दयानंद चाकोते 2) रविशंकर संजय खानापूरे दोघेही राहणार शिरुर अनंतपाळ यांना अटक करून त्यांच्यावर cr no 82/2021 कलम 188,272,273,34,भादवी सह कलम 59 अन्न सुरक्षा व मानके कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला सदरील तपास पोलीस निरीक्षक पी बी कदम हे करत आहेत, सदरील कामगिरी मध्ये पो हे कॉ तपघाले पोहेकॉ सारूळे सतीश सौदागर. मनोज मोरे. म्हेत्रे साहेब यांची उत्तम कामगिरी ठरली.