लातूर ग्रामीण मतदारसंघातील 82 किलोमीटर शेत पाणंद रस्त्याला मान्यता
लातूर (एल.पी.उगीले) : लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील जवळपास 82 किलोमीटर शेत पाणंद रस्त्याच्या कामांना भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा विधान परिषदेचे सदस्य आमदार रमेश आप्पा कराड यांच्या प्रयत्नामुळे मान्यता मिळाली आहे. या कामामुळे अनेक शेतकऱ्यांचे रस्त्याचे प्रश्न निकाली निघणार आहेत.
राज्याचे रोजगार हमी योजना तथा फलोत्पादन मंत्री संदिपानजी भुमरे यांच्या कडे लातूर ग्रामीण मतदार संघातील विविध शेत पांदण रस्त्याची कामे व्हावीत यासाठी वेळोवेळी आमदार रमेशआप्पा कराड यांनी पाठपुरावा केला होता. केलेल्या पाठपुराव्या मुळे मातोश्री ग्राम समृद्धी शेत पांदण रस्ते योजनेअंतर्गत लातूर ग्रामीण मतदार संघातील 82 किलोमीटर रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे.अशी माहिती आ. रमेश आप्पा कराड यांनी दिली आहे. यात रेणापूर तालुक्यातील 13 गावात 36.5 किलोमीटर, लातूर तालुक्यातील 13 गावात 24.5 किलोमीटर आणि भादा सर्कल मधील 6 गावात 21 किलोमीटर रस्त्याच्या कामाला मान्यता मिळाली आहे.मंजूर झालेल्या शेत पाणंद रस्त्याच्या कामात रेणापूर तालुक्यातील घनसरगाव दोन कामे, आरजखेडा दोन कामे, भोकरंबा, रामवाडी (ख) दोन कामे, पानगाव सहा कामे, चाडगाव, दवणगाव दोन कामे, आंदलगाव दोन कामे, कोष्टगाव, चाडगाव, फरतपूर, माणूसमारवाडी, रामवाडी (पा) दोन कामे, लातूर तालुक्यातील अंकोली, भातांगळी, एकुर्गा, भाडगाव, भुईसमुद्रा, सलगरा (ख), बामणी, सेलुबू, कानडी बोरगाव, आखरवाई दोन कामे, टाकळगाव दोन कामे, भोयरा दोन कामे, मुरुड औसा तालुक्यातील भादा सर्कल मधील टाका तीन कामे, समंदर्गा, ब्रहानपूर, दोन कामे, भादा दोन कामे, वरवडा, शिवली दोन कामे याप्रमाणे त्या त्या गावात रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे.सदरील कामाला मान्यता दिल्या बद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व रोजगार हमी योजना मंत्री तथा फलोत्पादन मंत्री संदिपानजी भुमरे यांचे आभारही आमदार रमेश कराड यांनी व्यक्त केले आहेत.
लातूर ग्रामीण मतदार संघातील शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य नागरिक यांच्या सुख सोयीसाठी आणि नागरी सुविधा पुरवण्यासाठी आपण शासन आणि प्रशासनाला वेळोवेळी पाठपुरावा करून लोककल्याणकारी योजना खऱ्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी वचनबद्ध असल्याचेही याप्रसंगी आ. रमेश आप्पा कराड यांनी सांगितले. शासनाच्या लोककल्याणकारी योजना गाव पातळीवरील खऱ्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शासन, प्रशासन आणि लाभार्थी यांच्यामधील दुवा बनून कार्य करावे. असेही आवाहन याप्रसंगी आ. रमेश आप्पा कराड यांनी केले आहे.
