पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर अधिकाऱ्यांवर कार्यवाही करणार – आमदार बाबासाहेब पाटील

पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर अधिकाऱ्यांवर कार्यवाही करणार - आमदार बाबासाहेब पाटील

अहमदपूर ( गोविंद काळे ) : तहसील कार्यालय, अहमदपूर येथे पाणीपुरवठा संदर्भात अहमदपूर चाकूर मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक आयोजित केली होती. उप- जिल्हाधिकारी प्रवीण फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली, उपजिल्हाधिकारी तथा प्रशासक अहमदपूर नगरपालिका आणि मान्यवरांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली.

यावेळी आमदार बाबासाहेब पाटील यांनी पाणीपुरवठा संदर्भात एकंदरीत आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ यावर उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर बैठक घेऊन संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल, असा सूचक इशारा या बैठकीवेळी आ.पाटील यांनी दिला.

प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद हेंगणे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, प्रशांत भोसले, अभय मिरकले, भैय्याभाई सय्यद, डॉ.फुजल जहागीरदार, ॲड.अलिम घुडनसाब, रविभाऊ महाजन, संदीपजी चौधरी, अय्याजभाई शेख, सुनील डावरे, फेरोज शेख, अनिस कुरेशी, उपअभियंता बडे, ऑफिस अधीक्षक, सतीश बिल्लापटे, पाणीपुरवठा विभाग मुसा शेख, अशोक सोनकांबळे, बाळू आगलावे आदी मान्यवर उपस्थित होते.

पाणीपुरवठा वितरण व पाणीपुरवठा एजन्सी कडून अपूर्ण राहिलेली कामे, स्वच्छतेबाबत शहरातील नागरिकांच्या असंख्य तक्रारी व स्वच्छता मजूर महिलांची संख्या वाढवणे, एक जेसीबी, पाच घंटागाडी वाढवणे, नूतन शाळा, लिम्रा कॉलनी, डी.सी.सी बँकेसमोरील सिमेंट काँक्रीटची कामे का झाली नाही?, अहमदपूर शहरातील पंतप्रधान आवास योजनेतील नवीन यादी का प्रलंबित आहे, मालमत्ता कर विभाग बाबत नागरिकांच्या असंख्य तक्रारी असून मालमत्ता कर विभाग अंतर्गत नागरिकांना प्रमाणपत्र दिल्यानंतर पावती का देण्यात येत नाही, अहमदपूर नगर परिषदेमध्ये सीसीटीव्ही बायोमेट्रिक मशीन बसवण्यात आले नाही, अरफात कॉलनी येथे नगरपरिषद अंतर्गत काम का घेण्यात आली नाही, नगरपरिषद संवर्ग कर्मचाऱ्यांचा कृती आराखडा शासनाकडे पाठवला आहे का, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंत डिव्हायडरच्या दोन्ही बाजूंनी माती असून रस्त्याच्या कडेचे साफसफाई व माती उचलण्यात यावी, नगरपरिषद कार्यालय शहराच्या बाहेर झाल्यामुळे ते नवीन कॉम्प्लेक्समध्ये स्थलांतर करण्यात यावे व नागरिकांना आवश्यक सुविधा लवकर देण्यात याव्यात, गुंठेवारी बाबत नागरिकांच्या तक्रारी असून महिन्यातून एक दिवस आपल्या स्तरावर बैठक घेऊन तक्रार दूर करण्यात यावी, शहरातील शॉपिंग सेंटर सिमेंट रोड ठिकाणी खराब झाला दुरुस्ती करणेबाबत, नगरपरिषदेमध्ये एक खिडकी योजना राबवणेबाबत, महिला बचत गटांना नगरपरिषद मार्फत अर्थसहाय्य पुरवणे व शासनाच्या विविध योजनांचा लाभ देणेबाबत, नगरपरिषद विभाग अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी लागणारे साहित्य व अग्निशमन मागणी व कर्मचाऱ्यांचे निवासस्थानाबाबत अशा विविध विषयांवर सविस्तरपणे बैठकीत चर्चा करण्यात आली.

About The Author

error: Content is protected !!