विज्ञाननिष्ठ व विवेकी समाज निर्मितीसाठी अंनिसचे कार्य कौतुकास्पद – प्राचार्य डॉ.ठोंबरे.

विज्ञाननिष्ठ व विवेकी समाज निर्मितीसाठी अंनिसचे कार्य कौतुकास्पद - प्राचार्य डॉ.ठोंबरे.

उदगीर (एल.पी.उगीले) : विज्ञाननिष्ठा, सामाजिक समता,बंधुता व सर्व धर्म समभावने मुळे सामाजिक ऐक्य मजबूत होते.विज्ञाननिष्ठ व विवेकी समाज निर्मिती साठी अंनिसची सतत धडपड चालू असते.आदर्श समाज निर्मितीसाठी अंनिसचे‌ कौतुकास्पद कार्य आहे. असे लातूरच्या शासकीय कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता, प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे म्हणाले.राष्ट्रिय पुरस्कार प्राप्त शिक्षक विश्वनाथ मुडपे यांच्या अध्यक्षतेखाली,अंनिस शाखा उदगीर तर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख अतिथी प्राध्यापक डॉ.दिनेशसिंह चौहान,प्रा. डॉ.विठोबा मुळे,अंनिस चे मार्गदर्शकव जिव्हाळा ग्रुपचे अध्यक्ष देविदास नादरगे इ.मान्यवरांच्या उपस्थितित होते.आंतरराष्ट्रीय विवेक दिन कार्यक्रमात बोलताना प्राचार्य ठोंबरे म्हणाले की, आपण विवेकवादी राहिल्यामुळे देशात शांतता, समृद्धी नांदते. लोकशाही मजबुत होते.तत्पूर्वी नुकताच जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित झालेल्या प्राचार्य बाबासाहेब ठोंबरेंचा भारतीय संविधानाची प्रत व पुष्पदेऊन देविदास नादरगे यानी सत्कार केला.
चंद्रकांत उप्परबावडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, चंद्रकांत रोडगे यानी उपस्थित पाहुणे व श्रोत्यांचे आभार मानले.

About The Author

error: Content is protected !!