लक्ष्मण रणदिवे यांच्या वाढदिवसा निमित्त ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप
देवणी (प्रतिनिधी) : देवणी येथील पत्रकार तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे देवणी तालुकाध्यक्ष, निर्भीड पत्रकार राजकीय, सामाजिक ,शैक्षणिक क्षेत्रातील चांगला अनुभव असलेले लोकप्रिय पत्रकार तथा देवणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण श्रीपती रणदिवे यांच्या वाढदिवसानिमित्त देवणी येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आय ए तांबोळी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस अनिल कांबळे, पत्रकार शकील मणियार, भैय्यासाहेब देवणीकर, कृष्णा पिंजरे, जयेश ढगे, ग्रामीण रुग्णालयातील परिचारिका बिडवे मॅडम, विरभद्रअप्पा चन्नाळे, सुरेखा साबणे, शेख एस एस, डिगोळे किशन आदि उपस्थित होते.तसेच या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले.
