ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; लामजना गावात ठिकठिकाणी अस्वच्छता, ग्रामपंचायतचे अक्षम्य दुर्लक्ष

किल्लारी (प्रतिनिधी) : औसा तालुक्यातील लामजना गावात ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे जागोजागी घाणीचे साम्राज्य, अस्वच्छता पसरली असून दुर्गंधीमुळे नाकाला रुमाल लावून नागरिकांना मार्गक्रमण करावे लागत आहे. महादेव मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य वाढले असून इथे डुक्करांचा वावर मोठया प्रमाणात वाढला आहे. अक्षरशः पाणी फिल्टरच्या पाईप लाईनला घाणीने वेढले आहे.

ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; लामजना गावात ठिकठिकाणी अस्वच्छता, ग्रामपंचायतचे अक्षम्य दुर्लक्ष

आणि पाणी फिल्टर ही शोभेची वास्तू बनली असून ग्रामपंचायतच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना मरणयातना सोसाव्या लागत आहे.महादेव मंदिर परिसराची दयनीय अवस्था झाली असून इथे मोठमोठे गवत व घाण वाढल्याने डुक्करांचा वावर वाढल्याने ही घाण नक्कीच आजारांना आमंत्रण देण्यास पोषक वातावरण ठरत आहे. ग्रामपंचायत याकडे कधी लक्ष देणार असा गंभीर सवाल जनतेतून विचारला जात आहे ?

पाणी फिल्टर च्या पाईपलाईन भोवताली पाण्याचे डबके साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढत असून , परिणामी ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; लामजना गावात ठिकठिकाणी अस्वच्छता, ग्रामपंचायतचे अक्षम्य दुर्लक्ष

आठवडी बाजारात ग्रामपंचायत कडुन कर आकारणी जोमाने केली जाते मात्र स्वच्छतेच्या दृष्टीने ग्रामपंचायत डोळेझाक पणा करत आहे. आठवडी बाजाराचा परिसर अक्षरशः उकिरडे बनला आहे. लोक मोकळ्या जागेत अतिक्रमण करून उकिरडा करत असून केरकचरा ,प्लास्टिक कॅरिबॅग ,अन्नाचे ,सडलेला भाजीपाला वगैरे उघड्यावर टाकत आहेत. त्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य वाढून डुक्करांचा वावर वाढला आहे. बाजारात पाण्याची उपलब्धता करून देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेच्या अनुषंगाने योग्य ती पाऊले उचलून नियोजनबद्ध कार्य करावे अशी मागणी लामजना ग्रामस्थांतून जोर धरू लागली आहे.

याबाबत ग्रामस्थांनी सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना वारंवार सांगूनही काहीच उपयोग होत नाही . यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन स्वच्छता मोहीम राबवण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

About The Author

error: Content is protected !!