रस्त्यावरील मुक्या जनावरांची तहान भागवण्यासाठी इनरव्हील क्लब उदगीरचा मायेची शीतलता उपक्रम

रस्त्यावरील मुक्या जनावरांची तहान भागवण्यासाठी इनरव्हील क्लब उदगीरचा मायेची शीतलता उपक्रम

उदगीर (एल.पी.उगीले) : इनरव्हील क्लब उदगीरच्या वतीने कडक उन्हाळ्यात रस्त्यावरील मुक्या जनावरांसाठी यशवंत सोसायटी, शहर पोलिस स्टेशन, आंबेडकर चौक,शंकरप्पा मठ या मुख्य रस्त्यासह शहरातील विविध ठिकाणी जनावरांना पाणी पिण्यासाठी पाणपोईची सोय करण्यात आली आहे. या अतिशय स्तुत्य उपक्रमासाठी प्रोजेक्ट प्रमुख होत्या सुहासिनी सुरशेटवार व त्यांच्या राधा कृष्ण बीसी मधील सदस्य संगिता पाटील,शैला पाटील,लक्ष्मीबाई सपाटे, सविता निटुरे,उमा पाटील,सविता कारभारी,अनुराधा सोनकांबळे,उमा ,मंगला केंद्रे,राजश्री नागापूरे,अनिता बिरादार इत्यादींनी पुढाकार घेतला होता.या उपक्रमासाठी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा मीरा चंबुले,उपाध्यक्षा स्वाती गुरुडे, कोषाध्यक्ष मानसी चन्नावार, एडिटर पल्लवी मुक्कावार व सदस्य पुजा गर्जे,मीरा गुरुडे, तुलसी देशमुख,वैभवी पटवारी, योजना चौधरी यांची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!