श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा केंद्रात हनुमान जयंती उत्साह साजरी

श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा केंद्रात हनुमान जयंती उत्साह साजरी

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा व बाल संस्कार केंद्र रेड्डी कॉलनी उदगीर या केंद्रात काल हनुमान जयंतीनिमित्त अभिषेक सोहळा, भजन, हनुमान चालीसा वाचन, आरती असे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.यावेळी भाविक भक्त, सेवेकरी,कार्यरत सेवेकरी यांची सायंकाळी साडेसहा वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आरतीसाठी जनसमुदाय मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन बामनपल्ले,पुजारी संजय कुलकर्णी महाराज,विनायक गादा, पांडुरंग गुडमेवार,सत्यवान बिरादार,जना बिरादार, वेदांत गादा,नवनाथ देशमुख,गणेश हंडरगुळे,बाबासाहेब देशमुख, महादेव स्वामी,निवृत्ती जवळे, सुनिता हंडरगुळे, तानाजी केंद्रे यांनी परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!