आ. धिरज देशमुख यांच्या वाढदिवसनिमित्त विपीन जाधव यांनी क्षय रुग्णांना मोफत पोषक आहार किट वाटप
उदगीर (एल.पी.उगीले) : क्षय रुग्ण (टी.बी.) मुक्त भारत या मोहिमेतर्गत आ. धिरज देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसचे उदगीर विधानसभा उपाध्यक्ष विपीन जाधव यांच्या वतीने क्षय रुग्णांना मोफत पोषक आहार किटचे वितरण राजीव गांधी सभागृह येथे करण्यात आले.
यावेळी बोलतांना नियमित उपचारासोबत पोषक आहार घेतल्याने क्षयरोग पूर्णपणे बरा होतो, समाजातील दानशूर लोकांनी क्षयरोग निर्मूलन आणि क्षय रोग मुक्त समाज निर्मितीत योगदान दयावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे यांनी केले. तसेच यावेळी त्यांनी विपीन जाधव यांच्या सामाजिक आणि आरोग्य विषयक कार्याचे कौतुक केले.
यावेळी काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष कल्यान पाटिल, डॉ. हणमंत वडगावे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सिद्धेश्वर मुन्ना पाटील, डॉ. प्रशांत कापसे उषा कांबळे, युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष विजय निटुरे, संतोष बिरादार, प्रा. देवनाळे, गजानन बिरादार, ज्ञानोबा गोडभरले , माधव कांबळे , पंचायत समितीचे माजी सदस्य दत्ता बामणे, जयप्रकाश कापसे, विठ्ठल वळसे, रवी पाटील, कपिल पाटील ,सचिन पंडित, प्रा.महेश बापाटले, नागेश पटवारी , यशवंत पाटील व युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन विपीन जाधव यांनी केले, यावेळी सूत्रसंचालन आणि आभार प्रा. देवनाळे यांनी मांडले.
