धक्कादायक! पोलिसाच्या मुलीवर अपहरण करून बलात्कार

धक्कादायक! पोलिसाच्या मुलीवर अपहरण करून बलात्कार

पुणे (महेश भिसे) : सर्वसामान्यांच्या सुरक्षेची जबाबदारी वाहणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीसोबतच तीन नराधमांनी क्रूर कृत्य केलं. पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीचं अपहरण २१ डिसेंबरला रात्री ८ वाजता अपहरण करण्यात आलं. मुलीचं वडगाव शेरी परिसरातून मुलीचं अपहरण केल्यानंतर तिच्यावर नेवासा परिसरात नेऊन बलात्कार करण्यात आला.

महिला सुरक्षेचा मुद्दा वारंवार चर्चेच्या केंद्रस्थानी येत असतानाच पुण्यात पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलीचं अपहरण करण्यापर्यंत आरोपींची मजल गेली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी एका पोलीस शिपायाची मुलगी आहे. तिची परिसरातील सागर नावाच्या तरुणाशी मैत्री होती. २१ डिसेंबरला रात्री आठ वाजताच्या सुमारास तरुणी रस्त्याने एकटी जात होती. त्यावेळी सागर दोन साथीदारांसह गाडीतून तिथे आला. त्याने तरुणीला अडवले आणि मी तुझ्यासोबत लग्न करतो, तू माझ्या गाडीत बस. गाडीत बसली नाही, तर मी जिवाचे बरेवाईट करून घेईन, असं म्हणाला.

त्यानंतर त्याने विषारी द्रव्याची बाटली तरुणीला दाखवली. त्यामुळे घाबरून तरुणी त्यांच्या गाडीत बसली. त्यानंतर तिघांनी तरुणीला गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध केलं व हातपाय बांधून नेवासा (अहमदनगर) परिसरात घेऊन गेले. तिथेच तरुणीवर बलात्कार केला. त्यानंतर तिला पुन्हा पुण्यामध्ये आणून सोडलं. तरुणीने त्यानंतर पोलिसांत फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी सागर मोहन सातव (वय २८) याच्यासह त्याच्या दोन्ही साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About The Author

error: Content is protected !!