कामावरुन काढण्यात आलेल्या वार्ड बॉय मारोती किनाके यांना परत कामावर घेण्याची मागणी
न्युज मिडीया पत्रकार असोसिएशनने दिले जिल्हा शल्य चिकित्सक यांना निवेदन
यवतमाळ (राम जाधव) : वणी ग्रामीण रुग्णालयात मागील १५ वर्षापासून वर्ग ४(वार्ड बॉय) या पदावर कार्यरत असलेल्या मारोती सुगन किनाके यांना रुग्णालय प्रशासनाने एका झटक्यात कामावरुन काढुन टाकल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच वार्ड बॉय असला तरी मारोती किनाके हा ग्रामिण रुग्णालयातील सर्व प्रकारचे कार्य तो करित असल्यामुळे ग्रामिण भागासह गोरगरीब रुग्णांना मोठा आधार मिळत होता. अशा कर्तव्य दक्ष वार्ड बॉय ची ग्रामिण रुग्णालयाला आवश्यकता असल्याने मारोती किनाके यांना परत कामावर घेण्याची मागणी न्युज मिडीया पत्रकार असोसिएशन च्या वतिने तूरंगतुषार वारे जिल्हा शल्य चिकित्सक यवतमाळ यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वणी ग्रामिण रुग्णालयात मागील १५ वर्षापासून वर्ग ४(वार्ड बॉय) या पदावर कार्यरत असलेल्या मारोती सुगम किनाके यांना रुग्णालय प्रशासन तसेच सक्षम कंपनी (मुंबई) यांनी रुग्णालयात नवीन कर्मचारी वर्ग ४ची (चतुर्थ श्रेणी)भरती केली असून १५ वर्षापासून अल्पशा मानधनावर सेवा देणाऱ्या मारोती सुगन किनाके यांना एकाकी कामावरुन काढण्यात आले आहे. त्यामुळे मारोती किनाके यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. परिणामी त्यांच्यावर अन्याय झाला आहे.विशेष म्हणजे मारोती किनाके हा वार्ड बॉय असुन ग्रामिण रुग्णालयात ते ऑपरेशन थेटर मध्ये काम करणे, ड्रेसिंग करणे, पोष्ट मार्टम करणे,साफ सफाई करणे, वार्डामध्ये नर्स ला मदत करणे, औषधि विभागात औषध लावणे (सेट करणे),टाके मारणे, कुजलेल्या मृतदेहाचे शव विच्छेदन करणे ईत्यादी कामे ते जबाबदारीने पाडत असल्यामुळे ग्रामिण रुग्णालयाला फार मोठा आधार होता. तसेच त्यांच्याबद्दलची कधी तक्रार आली नाही.
त्यामुळे मारोती सुगन किनाके यांना पुनश्च कामावर घेऊन न्याय देण्यात यावा, अशी मागणी न्युज मिडीया पत्रकार असोसिएशन चे अध्यक्ष मो.आसिफ शेख, उपाध्यक्ष दिपक छाजेड, सचिन परशुराम पोटे,सहसचिव निलेश चौधरी, कोषाध्यक्ष प्रविण शर्मा,इकबाल शेख,सागर मुने, महादेव दोडके, रवि कोटावार, विशाल ठोंबरे, दिगांबर चांदेकर,ज्ञानेश्वर बोनगिरवार यांच्यासह असोसिएशनच्या वतिने करण्यात आली आहे.