पाच वर्षीय सिद्रा ने ठेवला जीवनातील पहिला रोजा

पाच वर्षीय सिद्रा ने ठेवला जीवनातील पहिला रोजा

महागाव : येथील शहबाज सूरैया यांच्या पाच वर्षीय मुलगी सिद्रा सुरैय्या (०५) हिने रमजानचा दुसरा व सिद्रा हिच्या जीवनातील पहिला रोजा ( उपवास) ठेवला. सध्याचे तापमान आणि रखरखत्या उन्हाळ्यात पहाटे सकाळी ४.४७ वाजेपासून ते सायंकाळी ६.४१ वाजेपर्यंत रोजाच्या नियमांनुसार दिवसभर अन्न व पाणी न घेता उपाशी पोटी राहून अल्लाह (ईश्वर) प्रति श्रद्धा व्यक्त केली. सिद्रा हिने ठेवलेला रोजा थक्क करणारा ठरला आहे. सिद्रा हि माजी नगरसेविका हिना परवेज सुरैय्या यांची पुतणी आहे.

भारत देश कोरोना मुक्त होण्यासाठी अल्लाह कडे दुवाच्या माध्यमातून सिद्रा या चिमुकलीने साश्रुननांनी साकडे घातले आहे. पहिला रोजा पूर्ण केल्याबद्दल सर्व क्षेत्रातील मान्यवरांकडून सिद्रा हिचे कौतुक होत आहे.

About The Author

error: Content is protected !!