खाजगी शाळा, मंगलकार्यालय ताब्यात घेऊन कोविड रुग्णांची व्यवस्था करावी – अनिल माने

खाजगी शाळा, मंगलकार्यालय ताब्यात घेऊन कोविड रुग्णांची व्यवस्था करावी - अनिल माने

उमरखेड/महागाव (राम जाधव) : संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना रोगाने थैमान घातले आहे. त्यामुळे 14 एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 15 दिवसांचे निर्बंध लागले आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची ही दुसरी लाट महाभयंकर ठरत आहे. अशावेळी संभाव्य रुग्णवाढ पाहता खाजगी शाळा, मंगल कार्यालये, ताब्यात घ्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल माने यांनी केली आहे.

सरकारी दवाखाने, खाजगी दवाखाने आधीच फुल झाले आहे. काही बोटावर मोजण्याइतकेच बेड शिल्लक राहिले आहे. लस व जीवनवायूची कमतरता भासत असून त्याचा काळाबाजार वाढला आहे. परिस्थिती हाताबाहेर जात आहे. त्यामुळे परिस्थिती यापेक्षा खराब होण्याआधी त्यावर उपाय करणे गरजेचे आहे. सध्या जिल्ह्यामध्ये कोविडचे रुग्ण वाढत असून जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यामध्ये वाढते रुग्णांची संख्या पाहता जिल्ह्यामध्ये खाजगी व शासकीय रुग्णालय येथे रुग्णांना जागा मिळत नसून तो रुग्ण दगावला जाण्याची शक्यता असल्याने तात्काळ जिल्हा आपत्ती निवारण अध्यक्ष या नात्याने जिल्ह्यातील खाजगी तथा जिल्हा परिषद शाळा अधिग्रहण करून रुग्णांची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

About The Author