राज्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात 14 एप्रिल रात्री 8.00 वाजेपासून ते पुढील 15 दिवसांपर्यंत लॉकडाऊन जाहीर करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. या पंधरा दिवसाच्या कालावधीत सार्वजनिक वाहतूक बंद होणार नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
आस्थापना बंद राहतील
अत्यावश्यक सेवा वगळता इतर सार्वजनिक आस्थापने बंद राहणार. हॉटेल आणि रेस्टॉरंटना पूर्वीचेच निर्बंध लागू असतील. पार्सल किचन सुरू राहतील.
काय सुरू असेल
दवाखाने, विमा, औषधं, औषधी सेवा डिलर, लस उत्पादन कारखाने, लस वाहतूक वाहनं, वैद्यकीय कच्चा माल वाहतूक. जनावरांशी संबंधित- कृषीची जनावरं, पाळीव प्राणी, वेअरहाऊसिंग, पावसाळ्याची कामं करण्यासाठीचा कर्मचारी, रिझर्व्ह बँक, सेबी, ईकॉमर्स, अधिस्वीकृती धारक पत्रकार, पेट्रोल पंप, कार्गो सेवा, सुरक्षामंडळं सुरू राहतील.