प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव चे शहर अध्यक्ष बाळू आमले माळी महात्मा फुले राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित
लातूर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्ह्यात प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेले, प्रहार जनशक्ती पक्षाचे किनगाव शहराध्यक्ष बाळू आमले माळी यांना महात्मा फुले राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कार वितरण आणि गौरव सोहळ्याच्या प्रसंगी प्रमुख उपस्थिती मान्यवर श्री संत सावतामाळी यांचे वंशज ह भ प श्री रवीकांत महाराज वसेकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे वंशज दिलीपजी नेवसे , शिक्षक आमदार विक्रम काळे, पदवीधर आमदार सतीश चव्हाण, आमदार रमेशअपा कराड, महात्मा फुले ब्रिगेड चे प्रदेश अध्यक्ष दत्ताभाऊ माळी, सरचिटणीस उत्तम गोरे, आ. बाबासाहेब पाटील, राजुभाऊ चौगुले प्रहार जिल्हा अध्यक्ष, अभिजीत भैय्या देशमुख, संतोष भाऊ नागरगोजे, कुलदीप भैय्या सुर्यवंशी, प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव चे पदाधिकारी मोहसिन शेख,वैजनाथ सुनेवाड, युवराज आमले, शशीकांत बनसोडे, इम्रान पठाण, योगेश आमले,बालाजी पांचाळ, श्रीनिवास बनसोडे, सतीश श्रगारे, प्रकाश जोशी, गोविंद आंधळे,दशरथ हैगले, सुनिल श्रगारे, इत्यादी मान्यवर व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
बाळू आमले यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान राज्यस्तरीय पुरस्काराने केल्याबद्दल, प्रहार जनशक्ती पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
