चवणहिप्परगा सोसायटीच्या चेअरमनपदी अॕड दत्ता पाटील तर व्हाईस चेअरमन पदी बालाजी गुणाले

चवणहिप्परगा सोसायटीच्या चेअरमनपदी अॕड दत्ता पाटील तर व्हाईस चेअरमन पदी बालाजी गुणाले

देवणी (लक्ष्मण रणदिवे) : चवणहिप्परगा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत व्यंकटराव पाटील व भगवानराव पाटील तळेगावकर यांचे वर्चस्व अबाधित ठेवले आहे, चेअरमन,व्हाईस चेअरमन पद निवडीची प्रक्रिया पार पडली.चेअरमन पदी अॅड दत्ता व्यंकटराव पाटील तर व्हाईस चेअरमन पदी बालाजी बाबुराव गुणाले यांची बिनविरोध निवड झाली.यावेळी कोरे रमेश गुरप्पा ,गुरुडे नरसींग अंकुश ,पाटील दत्तात्रय व्यंकटराव, पाटील श्रीपत अनंतराव, पाटील सुभाष माणिकराव, पिलगुरे हणमंत संग्राम, बिरादार वसंत नागोराव, शेख मशीद आलाबोद्दीन, पल्लेवाड भामाबाई पंडू ,येलमटे जयश्री पुंडलीक , गुणाले बाबुराव बालाजी , कांबळे श्रीधर श्रीपती , गोसावी संतोष दत्तात्रेय आदींची उपस्थिती होती.नुतन चेअरमन व व्हाइस चेअरमन यांचा संचालक मंडळ व शेतकऱ्यांनी सत्कार केला.

About The Author

error: Content is protected !!