म. ज्योतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

म. ज्योतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (एन एस एस) विभागाच्या वतीने म. ज्योतीबा फुले यांच्या 196 व्या जयंतीनिमित्त अभिवादन सभा घेण्यात आली.सर्वप्रथम म. ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेस स्वामी विवेकानंद फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश तोलसरवाड, लाईफ सायन्स विभागाचे प्रमुख डॉ. धनंजय गोंड, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अमर तांदळे, पत्रकारिता व माध्यमशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. राहुल पुंडगे, ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. शेषनारायण जाधव यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी प्रा. राहुल पुंडगे यांनी म. ज्योतीबा फुले यांच्या जीवन व कार्य या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी महाविद्यालयातील प्रा.संजीवनी भालेराव, डॉ.चव्हाण एस एन,प्रा.आकाश कांबळे, प्रा. ऋतुजा दिग्रसकर, प्रा.हणमंत सूर्यवंशी, प्रा. उषा गायकवाड, वैष्णवी गुंडरे, अमोल मसुरे,अमोल भाटकुळे, अपर्णा काळे, शंकर पाटील, असिफ शेख, वैष्णवी शिंदे, अंबिका वाघमोडे, प्रेरणा कौलखेडकर, श्रुती थळपते, यांच्या सह विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!