श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताहाच्या सोहळ्यात सुरुवात
उदगीर (एल.पी.उगीले) : अखिल भारतीय श्री.स्वामी समर्थ गुरुपीठ श्री.क्षेत्र त्र्यंबकेश्वर द्वारा संचलित श्री.स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा व बाल संस्कार केंद्र साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक रामचंद्र नगर नांदेड रोड, उदगीर या केंद्रात श्री.स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त सुरुवात झाली असून, गुरुचरित्र पारायण सोहळ्यासाठी 175 भाविक भक्त, सेवेकरी, कार्यरत सेवेकरी गुरुचरित्र पारायण साठी बसले आहेत. हा सप्ताह 18 एप्रिल 2023 पर्यंत संपन्न होणार असून महाआरतीने या सप्ताह कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.या सप्ताह कार्यक्रमाचा लाभ उदगीर शहरातील व परिसरातील सर्व भाविक भक्त, सेवेकरी, कार्यरत सेवेकरी यांनी घ्यावा. असे आवाहन सचिन बामनपले, निवृत्ती जवळे यांनी केले आहे.
