हावगीस्वामीतील प्रा.बालाजीप्रसाद घाळे इंग्रजी विषयात नेट उत्तीर्ण
उदगीर(एल.पी.उगीले) : श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील इंग्रजी विभागात कार्यरत असलेले प्रा.बालाजीप्रसाद घाळे हे सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेल्या (नेट) राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.याबद्दल त्यांचा विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला. डिसेंबर २०२२ मध्ये त्यांनी ही परीक्षा दिलेली होती.यापूर्वी ते सेट व गेट परीक्षा उत्तीर्ण आहेत. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय गुरुजण,आई वडील व मित्र परिवारांना दिले आहे.
इंग्रजी विषयात नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड.गुणवंतराव पाटील हैबतपूरकर, सचिव उमेश पाटील देवणीकर, उपाध्यक्ष शिवकुमार हसरगुंडे, संगमेश्वर जिरगे,सहसचिव प्रभूराज कप्पीकेरे, कोषाध्यक्ष शंकरप्पा हरकरे, संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य, प्र.प्राचार्य डॉ.एन.जी. एमेकर, उपप्राचार्य डॉ.ए.ए.काळगापुरे, इंग्रजी विभागप्रमुख डॉ.विठ्ठल गोरे, प्रा.जे.डी.संपाळे,प्रा.ज्योती पाटील, महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
