बिलाल मन्सूर या विद्यार्थ्याच्या एमबीबीएस प्रवेशासाठी प्रहार पक्षाची मदत
उदगीर (एल.पी.उगीले) : प्रहार जनशक्ती पक्षाच्या प्रयत्नाने बिलाल मन्सूर सय्यद हा दिव्यांना असलेला विद्यार्थी उदगीर तालुक्यातील रहिवाशी असून त्याची शिकण्याची इच्छा असता एमबीबीएस ला नंबर लागत नव्हता. मात्र दिव्यांगाच्या कोठातून त्याला विशेष संधी प्राप्त झाली पाहिजे, असा अभ्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने घेण्यात आला. यासंदर्भात प्रहार चे तालुका सचिव अविनाश शिंदे यांचे मित्र आवलकोंडा येथील रहिवाशी जीलानी मस्तान बागवान यांनी या संदर्भात कळवल्यानंतर नागपूर येथील शासकीय MBBS कॉलेज येथे दिव्यांग कोट्यातून प्रहार च्या वतीने ऍडमिशन करून देण्यात आले .यासाठी आयुब शेख ,मन्सूर जाफरसाब सय्यद ,जीलानी मस्तान बागवान ,उमाकांत काकडे ,मनोज काकडे ,लतीफ मुबारक मुज्जेवार यांच्या अथक परिश्रम मुळे दिव्यांग विद्यार्थी बीलाल मन्सूर सय्यद एमबीबीएस बॅच नागपूर येथे ॲडमिशन मिळून दिल्याने प्रहार सेवक अविनाश शिंदे व टीम चे बिलाल मन्सूर सय्यद यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विनोद तेलंगे ,उदगीर तालुकाध्यक्ष रविकिरण बेळकुंदे ,तालुका उपाध्यक्ष महादेव मोतीपवळे,तालुका कार्याध्यक्ष महादेव आपटे ,व मित्र परिवार यांच्या वतीने बिलाल सय्यद विद्यार्थ्यांला पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. व अविनाश शिंदे ता. सचिव ,आयुब शेख,जिलानी मस्तान ,लतीफ मुंजेवार,मनोज काकडे,उमाकांत काकडे यांचा प्रहार च्या वतीने सत्कार करण्यात आला.