अट्टल वाहनचोरी करणाऱ्या टोळीस दरोडा विरोधी पथकाकडून अटक
३३,००,०००/- रू च्या ३५ दुचाकी हस्तगत
पुणे (सुहास पगारे) : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील मोबाईल स्नॅचिंग, चेन स्नॅचिंग, वाहन चोरी, घरफोडीचे गुन्हयास प्रतिबंध व्हावा व गुन्हे उघडकीस आणणेकामी मा. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड श्री कृष्ण प्रकाश यांनी सर्वांना सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. उत्तम तांगडे, पोलीस उप निरीक्षक श्री. मंगेश भांगे व दरोडा विरोधी विरोधी पथकाचे अंमलदार असे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तलयातील उघडकीस न आलेले वाहन चोरीच्या गुन्हयाबाबत माहिती घेवुन, रेकॉर्डवरील आरोपीची माहिती प्राप्त करून, त्यांचे मोबाईल क्रमांक प्राप्त करून, पोलीस आयुक्तालयाचे हद्दीतील त्यांचे आस्तित्वाबाबत तांत्रिक विश्लेषन करून, गोपनीय माहितीच्या आधारे, वाहन चोरांचा शोध घेत असताना, वखार महामंडळ चौक, पुणे नाशिक हायवे, भोसरी, या ठिकाणी दोन इसम गाडी विक्री करीता येणार असल्याची माहिती पोलीस उप निरीक्षक श्री. मंगेश भांगे यांना त्यांचे बातमीदारामार्फत प्राप्त झाली. माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. उत्तम तांगडे यांनी पोलीस उप निरीक्षक श्री. मंगेश भांगे यांची एक टिम तयार करून त्यांना कारवाई करणेबाबत सुचना दिल्या. त्याप्रमाणे वरील टिमने वरील ठिकाणी सापळा रचला असता माहिती मधील दोन इसम सदर ठिकाणी आले नाहित. त्या इसमाबाबत सखोल माहिती घेवून एक इसम हा आंबेगाव जि. पुणे येथे असल्याची माहिती मिळाल्याने आंबेगाव येथे टिमला पाठवून संकेत आनंदा धुमाळ, वय २२ वर्षे, रा. मुं.पो. खडकवाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे यास दिनांक १४/०४/२०२१ रोजी ताब्यात घेवुन, त्याच्याकडे सखोल व बारकाईने चौकशी करून, त्याचा साथीदार नामे श्रीकांत बाबाजी पटाडे, वय २३ वर्षे, रा. मुं. पो. बोरी बुद्रुक, ता. जुन्नर, जि. पुणे यास ताब्यात घेवुन दोन्ही आरोपीकडुन विचारपुस करता, त्यांनी चिखली पोलीस ठाणे गुरनं ४७०/२०२० भादवि कलम ३७९, ३४ हा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने, त्यांना सदर गुन्हयात अटक करण्यांत आली. तसेच त्यांचा तिसरा साथीदार नामे सुनिल आबाजी सुक्रे, वय-२६ वर्षे, रा. खडकवाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे. यास दिनाक १५/०४/२०२१ रोजी ताब्यात घेवुन, त्यांच्याकडे अधिक सखोल व बारकाईने चौकशी करून, त्यांच्याकडुन दोन मोटार सायकली हस्तगत करण्यांत आल्या. आरोपीतांचा पुर्व इतिहास तपासुन, आरोपी सुनिल सुक्रे याचेवर ०३ वाहन चोरीचे गुन्हे दाखल असल्याने आरोपी हे अट्टल वाहन चोर असल्याची खात्री झाल्याने आरोपीतांची दिनांक १८/०४/२०२१ रोजी पर्यंत पोलीस कोठडीची रिमांड घेवुन, सखोल व बारकाईने तपास करून, त्यांचेकडुन एकुण ३५ दुचाकी मोटार सायकली हस्तगत करण्यांत आल्या, सदरच्या मोटार सायकली हया अहमदपुर ( लातुर), जालना, शिरपुर जि. धुळे, कोपरगाव, शनिशिगंनापुर जि. अहमदनगर, आळेफाटा, आंबेगाव तालुका, जुन्नर तालुका व शिरूर तालुका या ठिकाणाहुन हस्तगत करण्यांत आल्या आहेत. त्यामध्ये
१) बजाज पल्सर १३,
३) बजाज डिस्कव्हर ०४,
५) रॉयल इन्फिल्ड ०३.
७) बजाज विक्रांता- ०१,
९) हिरो होंडा हंक ०१
२) हिरो स्प्लेंडर ०७,
४) यामाहा एफझेड ०३.
६) हिरो मेस्ट्रो- ०१,
८) टिव्हीएस स्पोर्ट ०१,
१०) होंडा अॅक्टीव्हा ०१
अटक आरोपीतांकडुन वरिल चोरीच्या मोटार सायकली बाबत खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत.
पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील उघडकीस आलेले गुन्हे
१) चिखली पोलीस स्टेशन गु.र.नं. ४७० / २०२० भा.द.वि.क. ३७९, ३४ २) चिखली पोलीस स्टेशन गु.र.नं. १४५/२०२० भा.द.वि.क. ३७९
३) चिखली पोलीस स्टेशन गु.र.नं. १३०/२०२० भा.द.वि.क. ३७९ ४) चाकण पोलीस स्टेशन गु.र.नं. ६९४/२०२० भा.द.वि.क. ३७९
५) सांगवी पोलीस स्टेशन गु.र.नं. ०६/२०२१ भा.द.वि.क. ३७९ ६) सांगवी पोलीस स्टेशन गु.र.नं. ४९५/२०२१ भा.द.वि.क. ३७९
७) सांगवी पोलीस स्टेशन गु.र.नं. ०१/२०२१ भा.द.वि.क. ३७९ ८) सांगवी पोलीस स्टेशन गु.र.नं. ४७०/२०२१ भा.द.वि.क. ३७९
९) भोसरी एम आय डी सी पोलीस स्टेशन गु.र.नं. २९१ / २०२१ भा.द.वि.क. ३७९ १०) पिंपरी पोलीस स्टेशन गु.र.नं. १५७ / २०२० भा.द.वि.क. ३७९
११) निगडी पोलीस स्टेशन गु.र.नं. ८८/२०२० भा.द.वि.क. ३७९ १२) निगडी पोलीस स्टेशन गु.र.नं. ८५८/२०२० भा.द.वि.क.३७९
१३) निगडी पोलीस स्टेशन गु.र.नं. २३६/२०२० भा.द.वि.क. ३७९
पुणे शहर आयुक्तालयातील उघडकीस आलेले गुन्हे
१४) भारती विदया. पोलीस स्टेशन गु.र.नं. ५५५/२०१८ भा.द.वि.क. ३७९
१५) भारती विदया. पोलीस स्टेशन गु.र.नं. ५२० / २०१८ भा.द.वि.क. ३७९ २१) भारती विदया. पोलीस स्टेशन गु.र.नं. १११८ / २०२० भा.द.वि.क. ३७९
१६) भारती विदया. पोलीस स्टेशन गु.र.नं. ६९९/२०१८ भा.द.वि.क. ३७९ १७) भारती विदया. पोलीस स्टेशन गु.र.नं. ६३१/२०१८ भा.द.वि.क. ३७९
१८) भारती विदया. पोलीस स्टेशन गु.र.नं. ६१३ / २०१८ भा.द.वि.क. ३७९ १९) भारती विदया. पोलीस स्टेशन गु.र.नं. ४४४/२०१८ भा.द.वि.क. ३७९
२०) भारती विदया. पोलीस स्टेशन गु.र.नं. ४५१ / २०१८ भा.द.वि.क. ३७९
२२) भारती विदया. पोलीस स्टेशन गु.र.नं. ३५८/२०२० भा.द.वि.क. ३७९ २३) भारती विदया. पोलीस स्टेशन गु.र.नं. ५७८/२०२० भा.द.वि.क. ३७९
पुणे ग्रामिण भागातील उघडकीस आलेले गुन्हे
२४) राजगुरुनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. २५१/२०२१ भा.द.वि.क. ३७९पुणे ग्रामिण भागातील उघडकीस आलेले गुन्हे
२४) राजगुरुनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. २५१/२०२१ भा.द.वि.क. ३७९
आरोपी बाबत माहिती घेता आरोपी संकेत धुमाळ याचे १२ वी पर्यंत शिक्षण घेवुन, त्याने अॅटोमोबाईलचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. तो पी. जी. कंपनीमध्ये सुपा येथे काम करीत आहे. श्रीकांत पटाडे (विवाहीत) याचे ११ वी पर्यंत शिक्षण झालेले असुन, तो ट्रॅक्टर चालविण्याचा व्यवसाय करतो. तसेच आरोपी सुनिल सुक्रे याने आय. आय. बी. एम. चिखली या कॉलेज मधुन हॉटेल मॅनेजमेन्ट चा कोर्स करीत होता. तसेच तो भारती विद्यापीठ कात्रज येथे गेस्ट सर्व्हिसेसच्या प्रशिक्षणासाठी असताना, त्या परिसरातील १० दुचाकी वाहने चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. हा मोटार सायकल चोरी करताना मास्टर चावीचा वापर करीत असे. सदर दुचाकी वाहने चोरून ती यातील आरोपी श्रीकांत पटाडे याचे मार्फतीने पुढील इसमांना वाहने १५,०००/- ते ५०,०००/- रू पर्यंत पैसे घेवुन, गाडीचे कागदपत्र नंतर देतो असे सांगुन, काही वाहनांवर स्वताःचे गाडीची नंबर प्लेट टाकुन, पैश्याची अडचण असल्याचे कारण सांगुन, वाहने गहाण ठेवीत असे व मिळालेले पैसे हे तिघांमध्ये वाटुन घेवुन मौजमजा करीत असे.
इतर वाहनांबाबत त्यांच्या इंजिन नंबर व चेसी नंबर वरून, त्यांचे मुळ मालकांचा व गुन्हे दाखल असलेबाबत शोध घेत आहोत.
सदरची कारवाई पिंपरी-चिंचवडचे मा. पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश, मा. अपर पोलीस आयुक्त श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे), गुन्हे, श्री. सुधीर हिरेमठ, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे २, श्री. श्रीकांत डिसले यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री उत्तम तांगडे, पोलीस उप निरीक्षक श्री. मंगेश भांगे, तसेच पोलीस अंमलदार महेश खांडे, राजेंद्र शिंदे, राहुल खारगे, विक्रांत गायकवाड, नितीन लोखंडे, आशिष बनकर, प्रविण कांबळे, सागर शेडगे, प्रविण माने, राजेश कौशल्ये, गणेश कोकणे, औदुंबर रोंगे, गोविंद सुपे यांचे पथकाने केली आहे.