ऑनड्युटी पोलिसांना चहा व नाश्ता वाटप

ऑनड्युटी पोलिसांना चहा व नाश्ता वाटप

पुणे (रफिक शेख) : भाजपा कला व सांस्कृतिक आघाडी व आपुलकी महिला व बालविकास संस्था पुणे यांच्यावतीने लॉकडाऊन काळात ऑनड्युटी सेवा देणाऱ्या पोलीस कर्मचारी यांना चहा व नाश्ता याचे वाटप फडके हौद चौक येथे जेष्ठ रंगकर्मी व सिने अभिनेते सुनीलनाना गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आले.

माणुसकीची जाण ठेवत समाज हितासाठी राबणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांसाठी चहा नाष्टा पुरवून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे.

        याप्रसंगी बारा बलुतेदार संघाचे प्रदेश अध्यक्ष रामदास सूर्यवंशी, भाजपा शिवाजीनगर महिला आघाडी उपाध्यक्ष कु.मंजू वाघमारे, रवी ओव्हाळ, रुपाली चव्हाण, सचिन साखरे, शुक्रवार पेठ पोलीस चौकीच्या  पी.एस.आय.तेजस्वी पाटील व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

        या उपक्रमाचे संयोजन कला व सांस्कृतिक आघाडीचे सरचिटणीस शैलेश बडदे व आपुलकी बालविकास संस्थेचे अध्यक्ष बाबू नाईक यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!