जिल्ह्यात उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1133
नवीन 1421 कोरोनाबाधित रुग्ण
लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील 39621 रुग्ण उपचाराने आजपर्यंत बरे झाले आहेत. आज नवीन 1421 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे असे प्रशासनाने जाहीर केले आहे.
लातूर जिल्ह्यात 1110 आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 386 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. तसेच प्रलंबित मधील 242 कोरणा बाधित रुग्ण आढळून आले आहेत. 2698 रॅपीड अॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 793 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 56778 झाली आहे. उपचार घेत असलेल्या 16195 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 962
रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 39621 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1133 आहे.