हातभट्टी दारूवर छापा; 1 लाख 89 हजाराचा मुद्देमाल जप्त

हातभट्टी दारूवर छापा; 1 लाख 89 हजाराचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी जिल्ह्यात अवैध रीतीने हातभट्टी दारू ची निर्मिती व विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी, निलंगा दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वाखाली मौजे कोराळवाडी ता. निलंगा येथील शेत शिवारामध्ये अवैधरित्या हातभट्टी दारू तयार करणाऱ्या इसमावर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर व कासारशिरशी पोलीस यांच्या संयुक्त पथकाने रविवारी दि. १८ एप्रिल रोजी छापेमारी करत यामध्ये 5600 लिटर रसायन मिळाले याची किंमत 1 लाख 89 हजार रुपये चे रसायन आणि हातभट्टी निर्मिती चे साहित्य नष्ट करण्यात आले, या कार्यवाहीत मधुकर लिंबाजी मेलगीरे, हरिश्चंद्र लक्ष्मण रेवणे, युवराज श्रीपती रेवणे, विठ्ठल लिंबाजी मेलगिरे, सर्व रा. कोराळवाडी, ता. निलंगा, जि. लातूर अशा एकूण चार आरोपीवर पो.ठाणे कासारशिरशी येथे गुरंन 101/2021, गुरंन 102/2021, गुरंन 103/3021, गुरंन 104/2021 महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (फ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरील कामगिरी पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण कोमवाड, पोलीस उपनिरीक्षक प्रताप गरजे, पोलीस अंमलदार अंगद कोतवाड, राजेंद्र टेकाळे, रामहरी भोसले ,हरून लोहार, युसुफ शेख, खुर्रम काजी, यशपाल कांबळे ,सिद्धेश्वर जाधव ,सुधीर कोळसुरे, राहुल सोनकांबळे प्रमोद तरडे, नागनाथ जांभळे , अहमद खान तसेच पोलीस ठाणे कासारशिरशी येथील पोलीस अंमलदार गोरोबा घोरपडे भीमाशंकर भोसले विकास भोंग यांनी परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!