ग्रामपंचात कारभारात गैरव्यवहार करणाऱ्या संरपंचावर कारवाईसाठी उपसरपंचाचा आत्मदहनाचा इशारा

ग्रामपंचात कारभारात गैरव्यवहार करणाऱ्या संरपंचावर कारवाईसाठी उपसरपंचाचा आत्मदहनाचा इशारा

अहमदपूर ( गोविंद काळे ) : तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय वरवंटी येथील १४ वा वित्त अयोग व दलित वस्ती कामाच्या गैरव्यवहाराची चौकशी झाल्यानंतर देखील सरपंचावर कारवाई होत नसल्यामुळे उपसरपंच यांनी आत्मदहनाचा इशारा दिला साहे
याविषयी सविस्तर माहिती अशी ग्रामपंचात कार्यलय वरवंटी येथे १४ वा वित्त अयोग व दलित वस्तीतील कामा संदर्भात सरपंच व ग्रामसेवक यांच्या गैरव्यवहारा विरोधात तक्रार अर्ज दि .३१.१२.२०२० रोजी उपसरपंच गजानन राठोड यांनी केला होता त्या अनुषंगांने पंचायत समिती कार्यालयामार्फत चौकशी केले असता खालील प्रकारे कोणतेही कामे न केल्याचे आढळून आले आहे . १. आर.ओ पाणि प्लॅन्ट २.८० लक्ष . २. दलित वस्तीतील नाली बांधकाम ३.०० लक्ष . ३. दलित वस्तीतील बोरवेल ७०,००० / – हजार रुपये . ४. कोरोना प्रदुर्भाव रोखण्यासाठी कोणतेही साधन न वाटप करता पैसे उचले . ५. अंगणवाडी ई – लर्निग न करता १,११,००० / ६. जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी शाळा फर्निचर न घेता २.०० लक्ष . ७. एल.ईडी बल्ब न बसवता १,६२,००० / – उचलले वरील सर्व कामास ना मासिक सभा घेतली ना ठराव घेतला सरपंच जनतेतून निवडून आल्यामुळे कोणत्याही सदस्यास विश्वासत न घेता मनमानी कारभार करत आहे . विकास कामाचे आलेले पैसे सरपंच व ग्रामसेवक यांनी आपल्या स्वतःच्या नावे २ , ९ ५,५०० / – धनादेश उचलेला आहे.

हे सर्व निर्दशनास येऊन देखील अहमदपूर पंचायत गटविकास अधिकारी सरपंचावर कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाहीत केवळ ग्रामसेवक हयांना निलंबीत केले आहे परंतु सरपंचाना कारवाई न करता पाठीशी घालत आहे असे दिसून येत आहे . झालेल्या चौकशीचा अहवाल देखील मुख्यकार्यकारी अधिकारी लातूर यांना पाठवलेला नाही भ्रष्ट सरपंचावर कार्यवाही झाली पाहिजे व येत्या १० दिवसात सरपंचावर योग्य ती कारवाई करुन निलंबीत करण्यात यावे अन्यथा मी १ मे ला सकाळी ठिक १०.०० वाजता आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे याची नोंद घ्यावी व याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हाधिकारी यांची राहिल अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.

About The Author