खा.ओमराजे निंबाळकर यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन केली पाहणी

खा.ओमराजे निंबाळकर यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन केली पाहणी

औसा (प्रशांत नेटके) : किल्लारी येथील ग्रामीण
रुग्णालयास खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भेट देऊन रुग्णालयात असलेल्या रुग्णांची विचारपूस केली. रुग्णांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधा, औषध उपचार, जेवण, आदी सोयी सुविधा याबाबत विचारपूस करण्यात आली. तसेच जिल्हा आरोग्य यंत्रणा व रुग्णालय वैद्यकीय अधिकारी यांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्याबाबत सूचना केल्या.

यावेळी शिवसेना समन्वयक किशोर जाधव, उपतालुका प्रमुख किशोर भोसले, विजय भोसले, बाळासाहेब बिराजदार, उपविभागीय अधिकारी श्री.अविनाश कांबळे, तहसीलदार शोभा पुजारी मॅडम, गटविकास अधिकारी श्री.भुजबळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.परगे, वैद्यकीय अधिकारी डॉ.दोडके, डॉ.सचिन बालकुंदे, सपोनि सुनील गायकवाड, तलाठी विकास बुबने आदी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!