मोदींच जबाबदार असतील, मोदींच करणार असतील तर ; तुम्ही सत्तेत काय झांजे वाजवायला बसलात का?

मोदींच जबाबदार असतील, मोदींच करणार असतील तर ; तुम्ही सत्तेत काय झांजे वाजवायला बसलात का?

1 मे चा 18 – 45 वयोगटातील राज्यातील लसीकरण नाही झालं तर नरेंद्र मोदी जबाबदार असतील. – Nana Patole

नाना पटोले तुम्ही सांगा सरकारने मागील एक वर्षात कोविड साठी काय काम केलात? तुम्ही लोक मरत असताना बेड उपलब्ध करून दिलात का? लोकांना ऑक्सिजन मिळत नाही, तुम्ही किती मेट्रिक टन ऑक्सिजन आणून दिलात? रेमडिसीवर च्या इंजेक्शन साठी नातेवाईक वणवण भटकत असताना तुम्ही किती पेशंट्ला इंजेक्शन मिळवुन दिलात?

राज्य सरकार चे दायित्व म्हणून तुम्ही किती राज्यातील जनतेसाठी काय केलात? राज्य सरकारने किती कोटींचा निधी आजपर्यंत महाराष्ट्रातील जनतेवर खर्च केलात? सरकार म्हणून तुमची जबाबदारी काय आहे? सगळंच जर मोदींना करायचं तर राज्य सरकार काय इथे वाढलेले कोंग्रेस गवत उपटायला स्थापन झाली का? लाज वाटली पाहिजे वाट्टेल ते आरोप करायला.

सत्तेत असून थोडीतरी संवेदनशीलता जवळ बाळगा नाना पाटोले. काल तुमचे मंत्री Amit V. Deshmukh विदर्भात दौऱ्यावर होते; त्यांना चांगला अनुभव आला आहे. जनता भडकलेली आहे. बिचाऱ्या आपलं आयुष्य संकटात टाकून काम करणाऱ्या कोविड योध्याचं वेतन तीन महिन्यापासून दिला नाहीत,हे देखील नरेंद्र मोदीजी येऊन देणार का? सत्तेत काय तुम्ही लोक खुर्च्या गरम करणे, मिरवण्यासाठी बसलात का?

तुम्ही एवढे नीच, निर्ढावलेले झालात, तुम्हाला जनतेची होत असलेली ससेहोलपट डोळ्याला दिसत नाही. राज्यात दिवसागणिक सरासरी आता 600 लोकांना प्राण सोडव लागतं आहे. तरी तुमच्या चेहऱ्यावर थोडंही दुःखच लवलेश नाही, छळत आहत जनतेला. तुम्ही रुग्णांची सेवा करणाऱ्या लोकांचं वेतन थकवत असाल, तुमच्या एवढे गेंड्याची कातडीचे सरकार आजपर्यंत राज्यात दुसरं झालं नसेल.

केंद्राने ऑक्सिजन द्यावं, केंद्राने रेमडिसिव्हर द्यावं, केंद्राने लस द्यावी. सगळंच तर देत आहे केंद्र. सर्व राज्यापेक्षा जास्त महाराष्ट्राला मिळालं आहे. केंद्राने आतापर्यंत 1700 मेट्रिक टन ऑक्सिजन महाराष्ट्राला दिलं आहे. केंद्राने 4 लाख 35 हजार रेमडीसीवर इंजेक्शन राज्याला दिलेत. केंद्राने 1 कोटी 59 लाख लस महाराष्ट्राला दिली आहे. म्हणून आज टेम्भा देशात सर्वाधिक लसीकरण करण्याचा मिरवत आहत ना ते फक्त केंद्राने दिलेल्या लसीमुळे मिरवत आहत. या चार पैकी एखादी तरी वस्तू तुम्ही राज्यातील जनतेसाठी स्वतःच्या तिजोरीतुन घेऊन आलात का?

अहो पटोले साहेब, तुम्हाला भिकच जर मागायची होती, तर रस्त्यावर मागितली असती त्यासाठी राज्यात सत्ता स्थापन करण्याची गरज नव्हती. जनतेचा विश्वासघात करून सत्तेवर आलात, म्हणून तुम्हाला राज्यातील जनतेचा छळ चालवला आहे. काय झालं तुमचं 12 कोटी लस विकत घेण्याचा निर्णयाचे? घरात नाही दाणा मला बाजीराव म्हणा, अशी गत झाली आहे तुमची. जनतेच्या मनात आग लागली आहे पटोले. तेल ओतू नका. जनतेने ठरवलं तर कोंग्रेस सकट तुमची MVA खाक करून टाकतील.

पटोले तुम्ही एसटी कामगारांचे पगार थकवल, तुम्ही हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या कामगारांचे पगार थकवल, तुम्ही मागील एक वर्षात काय केलं? तर फक्त आणि फक्त वसुली केली, आणि होत नसल्याने जबाबदारी झटकून केंद्राकडे बोट दाखवत आलात. थोडीतरी लाज वाटू द्या. 1 मे ला देशभरात लसीकरण होत आहे, महाराष्ट्रात का होणार नाही? सर्व राज्यांनी लसीची ऑर्डर दिली आहे, महाराष्ट्र सरकारने का ऑर्डर दिली नाही? सगळीकडे उपलब्ध होत आहे फक्त महाराष्ट्राला उपलब्ध होत नाही का? महाराष्ट्र सरकारची लसीकरण करण्याची ईच्छा नाही का? हे जनतेलाही कळू द्या.

नाना पटोले देवाने तोंड चांगलं बोलणं, चांगलं खाण्यासाठी दिलं आहे एवढं तरी भान असू द्या!

  • प्रकाश गाडे

About The Author