लातूर कॉंग्रेस विविध विभाग सेल जिल्हाध्यक्षपदाच्या निवडी जाहिर

लातूर कॉंग्रेस विविध विभाग सेल जिल्हाध्यक्षपदाच्या निवडी जाहिर

लातूर कॉंग्रेस माध्यम विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी हरिराम कुलकर्णी

लातूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटी च्या अंतर्गत लातूर जिल्ह्यातील कॉंग्रेस पक्षाच्या विविध आघाडीच्या सेल च्या जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडी शनिवारी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाअध्यक्ष श्रीशैल्य उटगे यानी भारताचे माजी गृहमंत्री शिवराजजी पाटील चाकूरकर, महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अमित देशमुख, राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार धिरज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घोषित करण्यात आल्या असुन कॉंग्रेस पक्षाने निवडीत जिल्यातील सर्व तालुक्यातील पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते याना संधी देवून सोशल इंजीनियरिंग चा प्रयत्न केला आहे विशेष म्हणजे या नुतन विविध सेल च्या जिल्हाध्यक्षाच्या निवडीत विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे कॉंग्रेस कार्यकर्ते यांना पक्षात काम करण्यासाठी निवड झाल्याने कॉंग्रेस पक्षाला लातूर जिल्यात पक्ष वाढीसाठी मोठा फायदा होणार आहे

जिल्हा कॉंग्रेस च्या अंतर्गत खालील विविध विभागाच्या सेल च्या जिल्हाअध्यक्षपदी निवड करण्यात आली असून त्यात कॉंग्रेसचे माध्यम विभागाचे जिल्हाध्यक्ष म्हणून (1) हरिराम कुलकर्णी (देवनी),
(2) अँड बाबासाहेब गायकवाड (मागासवर्गीय सेल) औसा, (3) डॉ उमाकांत जाधव (ग्रंथालय विभाग) निलंगा, (4) डॉ पवन लड़ा (पर्यावरणविभाग) लातूर, (5) अँड प्रदीपसिंह गंगने (विधीविभाग) लातूर (6) सिराजूद्दीन जहागीरदार (अल्पसंख्याक सेल) अहमदपूर,
(7) प्रा.एकनाथ पाटील (ओबीसी सेल) शिरुरअनंतपाळ, (8) किरण पवार ( किसान सेल) जळकोट, (9) संदीप पाटील (वाहतूक विभाग सेल) औसा, (10) राम चामे ( दिव्यांग विभाग) लातूर, (11) प्रताप भोसले (उच्च व तन्त्र शिक्षण विभाग) औसा, (12) सुरेश चव्हाण (भटक्या विमुक्त जाती सेल) लातूर विविध विभागाच्या जिल्हाध्यक्ष म्हणून निवडी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केल्या असुन सर्व नवनिर्वाचित नुतन विविध सेल चे पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

जिल्यातील सर्वच तालुक्यातील सर्व समाजातील लोकाना न्याय देण्याचा प्रयत्न – जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे

आगामी काळात लातूर जिल्यातील नगरपंचायत निवडणुका होणार असून भविष्यात जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समिती, बाजार समितीच्या निवडणुका होणार आहेत त्यासाठी आतापासून कॉंग्रेस पक्षाचे संघटन व पक्षाची ताकत वाढवण्याकरिता विविध क्षेत्रांतील कॉंग्रेस चे कार्यकर्ते याना संधी दिली आहे त्याचा निश्चितपणे आगामी निवडणुकीत पक्षाला फायदा होईल त्यादृष्टीने कॉंग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती श्रीशैल्य उटगे यांनी दिली.

About The Author