दिवसभरात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1720

दिवसभरात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1720

नवीन 1215 कोरोनाबाधित रुग्ण

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील 54181 रुग्ण उपचाराने आजपर्यंत बरे झाले आहेत. आज नवीन 1215 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे असे प्रशासनाने जाहीर केले आहे.

लातूर जिल्ह्यात 1600 आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 390 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. 3267 रॅपीड अ‍ॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 813 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 69030 झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 13644 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 1215 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 54171 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1720 आहे. 469 अहवाल प्रलंबित आहेत.

About The Author