बेफिकीर ग्रामस्थांमुळे वाढतोय कोरोना
आरोग्य विभागाच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष
औसा (प्रशांत नेटके) : तालुक्यातील लामजना व तपसेचिंचोली च नाही ,तर ग्रामीण भागात कोरोनाने पाय पसरविणे सुरू आहे,परंतु आजही ग्रामीण भागात नागरिकांत कोरोनाचे गांभीर्य दिसून येत नाही. चौकात, मंदिराच्या दुकानाच्या आजूबाजूला नागरिकांची गर्दी होत आहे. नागरिक मास्कविना संचार करत असल्याचे दिसून येत आहे. रात्रीच्या वेळी चौकात गप्पागोष्टीची चांगलीच मैफिल रंगत आहे. शाळेच्या आवारात युवक मोबाईलवर गेम खेळत रात्री 12 वाजेपर्यंत एकत्रित बसून गप्पा मारत असतात. या बेफिकीर युवक व नागरिकांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे ग्रामीण भागात चित्र दिसत आहे. कोण कुणाच्या संपर्कात आला असेल, हे सांगणे कठीणच आहे.
ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढू नये म्हणून लामजना प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, नर्स, आरोग्य सेविका, आशा कार्यकर्ती स्वतःची जबाबदारी पार पाडत आहेत. सामाजिक अंतर पाळावे, बाहेरून आल्यानंतर साबणाने स्वच्छ हात धुवुनच घरामध्ये प्रवेश करावा, सॅनिटायझर वापर करावा, असे मार्गदर्शन आरोग्य विभागाकडून वारंवार केले जात आहे.45 वर्षाच्या पुढील सर्वांनी लस घ्यावी असेही आवाहन केले जात आहे.
६० वर्षावरील सर्व कोरोना रुग्णांनी , कोमोर्बीड रुग्ण (बीपी ,शुगर इतर गंभीर आजार )असलेल्या रुग्णांनी डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय होम आयसोलेशन घेऊन घरी राहू नये, शरीरातील ऑक्सिजन पातळी कधी पण कमी होण्याचा धोका संभवतो व परिणामी रुग्ण दगावतो – डॉ संदीप पेंढारकर, वैद्यकिय अधिकारी (प्रा आ केंद्र लामजना )