शिवाजीनगर पोलिसांनी नकली गावठी कट्टा व कोयता बाळगणाऱ्या कुंख्यात तडीपार आरोपीला केले अटक
पुणे (रफिक शेख) : येथील कुंख्यात तडीपार आरोपी नामे यश दत्ता हेळेकर (वय – 24) रा.806 कामगार पुतळा शिवजीनगर पुणे. हा कामगार पुतळा येथे आला असल्याची व त्याच्या कडे बनावट गावठी कट्टा व कोयता असल्याची गुप्त बातमी शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे सर्वेलन्स विभागाचे अंमलदार राहुल होळकर यांना मिळाली असता सदर आरोपीस सापळा रचून ताब्यात घेतले असता त्याच्या ताब्यातील एक बनावट गावठी कट्टा व कमरेला कोयता मिळून आला आहे. सदर आरोपी हा सध्या तडीपार असून तो दहशत माजवणे करीता हद्दीत परत आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदर तडीपार आरोपीवर शिवाजीनगर पोलीस स्टेशन गुन्हा राजि नं – 39/2021 भारतीय हत्यार कायदा कलम 4(25) मु पो का कलम 142 ,महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37 (1) सह 135 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही, श्रीमती प्रियंका नारनवरे पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०१ पुणे शहर, मालोजीराव पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग पुणे शहर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलिमा पवार, पोलीस निरीक्षक(गुन्हे) विक्रम गौड शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली व सुचनेनूसार शिवाजीनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.रामदास मुंढे, पो उ नि.विनोद मंहागडे, मार्शलचे पोलीस अंमलदार अमोल लोंढे व अमोल मोटे, तपास पथकातील सागर रासकर, शिंरकाडे, फडतरे यांच्या पथकाने कामगीरी केली आहे.