महाराष्ट्र दिनी ध्वजारोहन न करणे हा महाराष्ट्रद्रोह आणी हुतात्म्यांचा अपमान करणे होय…!

महाराष्ट्र दिनी ध्वजारोहन न करणे हा महाराष्ट्रद्रोह आणी हुतात्म्यांचा अपमान करणे होय...!

सम्राट मित्रमंडळाने पाठविले मुख्यमंत्र्यांकडे निवेदन

अहमदपूर (गोविंद काळे ): 1मे महाराष्ट्र दिनी राज्यात सर्वत्रच ध्वजारोहनास करण्यास बंदी घालणे हा.महाराष्ट्र द्रोह असून संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा देणाऱ्या हुतात्म्यांचा अपमान करणा होय अशा आशयाचे निवेदन येथील युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे पाठविले आहे. येथील सम्राट मित्रमंडळाच्या वतीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, 1मे हा महाराष्ट्र राज्याचा वर्धापन दिन आहे.मोठ्या संघर्षाने आणी असंख्य हुतात्म्यांच्या प्राणाच्या बलिदानानंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आहे. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फक्त जिल्ह्याच्या मुख्यालयीच ध्वजारोहन करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.म्हणजेच जिल्हा व तालुका आणी ग्रामीण स्तरावर कोठेच ध्वजारोहन करू नये अशा सूचना दिलेल्या आहेत.

शासनाने घेतलेला हा निर्णय पूर्णतः चुकीचा आहे.गेल्या वर्षांत सूध्दा 1 मे ला लाॅकडावून असताना शासकीय स्तरावर सर्वत्रच सर्वत्रच ध्वजारोहण झाले होते. मात्र यंदा शासनाने अजब गजब सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्रा राज्याची निर्मिती ही मोठ्या कठीण संघर्षांनंतर व अनेकांचे जीव गमावल्यानंतर झालेली  आहे याची आठवण शासनाने ठेवने गरजेचे होते.

ज्या पध्दतीने जिल्हास्तरावरील शासकीय ध्वजारोहन कोरोनाचे सर्व नियम पाळत होवू शकतात तर तालुकास्तरावर हे नियम पाळून ध्वजारोहन का होवू शकत नाही…??? असा प्रश्न जनतेला पडला आहे. म्हणून 1मे रोजी सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय येथे हा ध्वजारोहन होणे अत्यंत गरजेचे आहे असे आम्हाला वाटते. महाराष्ट्र दिनी ध्वजारोहन करू नये हा काळा आदेश शासन आदेश सर्व महाराष्ट्रातील जनता कधीच विसरणार नाही.

तरी महाराष्ट्र प्रेमी नागरिकांनी उद्या 1मे च्या दिवशी महाराष्ट्र दिनाचा वर्धापन दिन सर्वत्रच शासनाने घालून दिलेल्या कोरोनाच्या संदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन करून,फिजिकल डिस्टंग्सीग ठेवून,मास्क,सॅनेटायझर इत्यादीचा वापर करून अगदी चार व्यक्तींनी मिळून ध्वजारोहन ठिकठिकाणी करावे असे अवाहन एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

About The Author