आमदार बाबासाहेब पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
अहमदपूर ( गोविंद काळे ) : लॉकडाऊन काळातही शिक्षणाची परंपरा अखंडपणे चालू होती. या सर्व गोष्टींमागे शिक्षण क्षेत्रात असणाऱ्या सर्व शिक्षक,कर्मचारी यांची अव्याहतपणे सेवा होती. महाराष्ट्र राज्याच्या शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा उंचावण्यासाठी कुशल मनुष्यबळ राज्य, विभाग आणि जिल्हास्तरावर उपलब्ध व्हावे या उद्देशाने DIET, RAA, SCERT संस्थांमध्ये विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून विषय सहाय्यक पदाची नेमणूक करण्यात आली होती . परंतु लाॅकडाउनच्या काळामध्ये या शिक्षकांनी शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्रमांचा सक्रिय सहभाग घेऊन चांगल्या प्रकारे कार्य केलेले आहे.
या सर्व शिक्षकांना महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री ना.वर्षा गायकवाड यांनी विशेष सहाय्य पदावर मुदतवाढ देऊन सहकार्य करावे अशी विनंती आमदार बाबासाहेब पाटील यांनी केली होती. या विनंतीला मान देऊन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या सर्व शिक्षकांना मुदतवाढ देण्याचे आदेश दिले असून, त्याची लवकरच अंमलबजावणी होत आहे. आमदार बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या या मागणीला यश आले असुन याचा सर्वत्र आनंद होत आहे.
याबद्दल महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि महाराष्ट्र सरकार यांचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी मनापासून अभिनंदन करून आभार मानले आहेत.