यशवंत विद्यालयात इंधन बचत या विषयावर गटचर्चा
अहमदपूर ( गोविंद काळे ) : भारत सरकारच्या पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघ(पेट्रोलियम कन्झर्वेशन रिसर्च असोसिएशन PCRA) च्या सक्षम माहोत्सव 2023 हा कार्यक्रम देशात दि.24 एप्रिल ते 7 मे या दरम्यान सुरु आहे.या मोहत्सवाचे इंधन बचतीवर गट चर्चाचे आयोजन यशवंत विद्यालयात कोटापँटर्न मधिल विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शिवसाई एच.पी. गँस एजन्सी अहमदपूर च्या वतीने करण्यात आला.
कलाध्यापक महादेव खळुरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना इंधन बचतीचे शपथ देऊन इंधन बचत करण्यासाठी वाहनाची वेळेवर सर्व्हिसिंग करणे.वाहनाच्या टायरमधील हवा चेक करणे.इंजनचे आँईल वेळेवर बदल करणे.कमी अंतरासाठी मोटारसायलचा वापर टाळणे.
तसेच घरात एलईडी,सीएफएल बल्पचा वापर करणे.यामुळे विद्युत बचत होते. याबाबत मुलांना मार्गदर्शन केले.तसेच शिवसाई एच.पी. गँस एजन्सीचे संचालक अभिजीत पाटील यांनी गँस बचत करण्यासाठी अन्न शिजवण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर करावा.गँसचे बर्नर वेळेवर स्वच्छ करणे.योग्य वेळी छोटा बर्नरचा व लहान कमी जाडीचे पातेल्याचे वापर करणे.काम झाल्यानंतर गँस सिलेंडरचे स्वीच बंद करणे.इत्यादी कारणाने गँसची बचत करता येते.अशी माहिती दिली.कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा यशवंत कोटा पँटर्नचे समन्वयक खय्युम शेख यांनी भविष्यात भावी पिढीला इंधन उपलब्ध रहाण्यासाठी आपण इंधनचा सुयोग्य वापर करावे.योग्य वेळीच इंधनचा वापर करावा असा संदेश समारोप प्रसंगी दिला.
सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ.अशोक सांगवीकर ,सचिव शिक्षणमहर्षी डी. बी. लोहारे गुरुजी, मुख्याध्यापक वाघंबर गंपले,उपमुअ उमाकांत नरडेले , पर्यवेक्षक दिलीप गुळवे ,गजानन शिंदे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी कौतुक केले.