कामगारांचे प्रश्न मार्गी लागले – आ. बनसोडे

कामगारांचे प्रश्न मार्गी लागले - आ. बनसोडे

उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर विधानसभा मतदारसंघातील कामगारांनी आपल्या विविध प्रश्नांच्या, व मागण्यांच्या संदर्भामध्ये आ. बनसोडे आणि कामगार आयुक्त मंगेश झोले यांच्यासह मान्यवरांच्या समोर कामगार दिनाच्या निमित्ताने आयोजित महाराष्ट्र शेतकरी व बांधकाम कामगार मजूर संघटनेच्या वतीने आयोजित कामगार मेळाव्यात मांडल्या होत्या. यामध्ये प्राधान्याने कामगारांना कीट वाटप, कामगारांच्या नावावर जमीन नसल्याने घरकुलाच्या वाटपाचा निर्माण झालेला प्रश्न, तसेच कामगारांच्या आरोग्याचे प्रश्न, विमा प्रश्न यासह कामगारांना सोयीचे होईल. अशा अन्य योजनांच्या संदर्भात चर्चा झाली होती. त्यावेळेसही आ. संजय बनसोडे यांनी मेळाव्यातील उपस्थित कामगारांना आश्वासन दिले होते. आपण दिलेला शब्द पूर्ण झाला पाहिजे, यासाठी मुंबई येथे मंत्रालयामध्ये बांधकाम विभागाचे सचिव, औरंगाबाद विभागाचे विभागीय कामगार आयुक्त, लातूर जिल्ह्याचे कामगार अधिकारी आणि कामगार प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत विशेष बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीमध्ये कामगार विभागाच्या प्रधान सचिवांनी सकारात्मक प्रतिसाद देत या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी हिरवा कंदील दाखवला आहे. यासंदर्भात बोलताना आ. बनसोडे यांनी सांगितले की, मी कामगारांचा मुलगा असल्यामुळे कामगारांच्या समस्या मला माहित आहेत. त्या अडचणी सोडवणे अत्यंत गरजेचे आहे. ते सर्व प्रश्न मार्गी लागले असून लवकरच त्यावर कारवाई होईल. कामगारांच्या प्रश्नाला प्राधान्य देणे गरजेचे होते, त्यामुळे मी विशेष प्रयत्न करून हा प्रश्न मार्गी लावत आहे. या दृष्टीने आवश्यकता पडल्यास मंत्रालयात पुन्हा बैठक लावून सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा शब्दही त्यांनी कामगार प्रतिनिधींना दिला आहे. या बैठकीतील सकारात्मक धोरणामुळे “शब्दाला जागणारा नेता” अशी ओळख आ. संजय बनसोडे यांची झाली आहे. कामगारांचे प्रश्न मार्गी लावत असल्याबद्दल कामगार संघटनांच्या वतीने त्यांचे आभारही मानण्यात आले आहेत.

About The Author

error: Content is protected !!