चहाच्या टपरीवजा हॉटेलवर महिलेचा विनयभंग करून तिच्या मुलाला मारहाण, गुन्हा दाखल
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर लोणी या छोट्याशा गावात, हॉटेलवर चहाच्या टपरीवर अचानक सहा लोक आले आणि तू लोकांना चहा कशाला पाजतेस? असे म्हणत हॉटेल वजा टपरी चालवणाऱ्या संगीता शंकर फड (वय 40 वर्ष) यांना मारहाण करत वाईट उद्देशाने तिचे ब्लाउज फाडून तिचा विनयभंग केला, व तिचा मुलगा सुनील फड आणि त्याचा मित्र प्रशांत सताळे याला मारहाण केली. तसेच हॉटेलमधील खुर्च्या आणि टेबल ची मोडतोड करून जवळपास चार हजार रुपयांच्या आर्थिक नुकसान केले. अशी तक्रार संगीता शंकर फड यांनी दिल्यावरून उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गु.र.न. 313 /23 कलम 354, 354, 323, 324, 427, 143, 147, 148, 149 भारतीय दंड विधान संहिता अन्वये आरोपी राजूद्दीन शेख, अमीर शेख, अल्ताफ शेख, अरबाज शेख, सोहेल इस्माईल शेख (सर्व रा. लोणी ता. उदगीर) आणि राजुद्दीन शेख यांचा हैबतपुर येथील पठाण आडनाव असलेला मावस भाऊ यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. घटनास्थळावर पोलीस निरीक्षक अरविंद पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक भोळ यांनी भेट देऊन पाहणी केली.
याच प्रकरणी फिर्यादी राजुद्दीन शेख व्यवसाय ड्रायव्हर यांनी तक्रार दिली की, सुनील फड, गणेश बाबुराव पाटील, निखिल विजयकुमार बिरादार, प्रशांत सूर्यकांत सताळे, ईश्वर चव्हाण, प्रशांत सिताराम डोईफोडे, लक्ष्मण सूर्यवंशी (सर्व रा. लोणी) यांनी संगीता फड यांच्या हॉटेलवर चहा पिण्यास गेलेल्या मुलाला बोलवण्यासाठी गेले असता, त्यांच्याच बाचाबाची होऊन शिवीगाळ झाली. व त्यातच सिमेंटच्या ठोकळ्यांनी गुडघ्यावर व पाठीवर मारून दुखापत केली व शिवीगाळ केली. लाथा बुक्क्यांनी मारहाण झाली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यावरून आरोपीविरुद्ध गु. र.न. 315 /23 कलम 143, 147, 148, 149, 435, 324, 323, 504, 506 भारतीय दंड विधान संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भोळ हे करत आहेत.