जनावरांच्या विविध साथीच्या रोगांवर उपचार व वंद्यत्व निवारण शिबिर संपन्न

जनावरांच्या विविध साथीच्या रोगांवर उपचार व वंद्यत्व निवारण शिबिर संपन्न


लामजना (प्रशांत नेटके) : औसा तालुक्यातील लामजना पशुवैद्यकीय केंद्रा अंतर्गत तपसे चिंचोली येथे जनावरांच्या विविध रोगांवर उपचार, वंध्यत्व निवारण, लसीकरण, टॅग मारून बिल्ला मारून तपासणी करण्यात आली. यावेळी जनावरांच्या बिल्ला मारून त्याची नोंदणी पशुपालकांच्या आधार क्रमांका सोबत करण्यात येत आहे. या शिबिरात पशुपालकांना जनावरांच्या रोगाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी लामजना पशुवैद्यकीय केंद्रातील डॉ हंगरगे साहेब, पवार आर डी, कांबळे बी के, रमेश लाव्हरे (कृत्रिम रेतन सेवक), प्रमोद नेटके, माधव पेटकर, प्रदीप नेटके, विश्वंभर चौधरी, दिलीप नेटके, दत्तू जाधव यांच्यासह गावातील पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author