दिवसभरात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 520

दिवसभरात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 520

नवीन 202 कोरोनाबाधित रुग्ण

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील 81872 रुग्ण उपचाराने आजपर्यंत बरे झाले आहेत. आज नवीन 202 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे असे प्रशासनाने जाहीर केले आहे.

लातूर जिल्ह्यात आज 853 आरटीपीसीआर चाचणी साठी नमुने घेण्यात आलेलेआहेत. 127 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. 1073 रॅपीड अ‍ॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 75 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 87705 झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 3843 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 1990 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 81872 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 520 आहे.

About The Author