राष्ट्रवादी काँग्रेसचे ईडी आणि भाजपा सरकार विरोधात आंदोलन
उदगीर (एल.पी.उगीले) : केंद्र सरकारच्या वतीने आपल्या तयारीतील विविध यंत्रणांचा गैरवापर करून राजकीय सुडबूद्धीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांना ईडीची नोटीस देऊन नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न भाजप सरकारने चालवला आहे.
या दडपशाहीच्या निषेधार्थ उदगीर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.
माजी राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत, व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रा.शिवाजीरावजी मुळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उदगीर जळकोट विधानसभा अध्यक्ष प्रा.प्रवीणजी भोळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष समीर शेख, उदगीर कार्याध्यक्ष गजानन सताळकर, अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्ष शफी भाई हाश्मी, युवक तालुका अध्यक्ष रोहीदास कोंडगीर, युवक शहराध्यक्ष अजय शेटकार, महीला शहराध्यक्षा दिपालीताई औटे नगरसेवक अनिल भाऊ मुदाळे, नगरसेवक फय्याज भाई शेख, युवा नेते सय्यद जानी भाई शेख, श्याम भाऊ डावळे, जिल्हा उपाध्यक्ष संघशक्ती बलांडे, सामाजिक न्याय विभागाचे तालुका कार्याध्यक्ष प्रदीप जोंधळे, शहर उपाध्यक्ष सतिश कांबळे, युवा नेते अभिजित औटे,अखीब शेख, शिवकुमार कांबळे, बालू सगर, युवक विधानसभा अध्यक्ष रमन अदावळे, अक्षीत हेरकर, अखिल भाई मोमीन आदी उपस्थित होते. व तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.