रूध्दा गावच्या सरपंच वंदना केंद्रे यांची जिल्हा समन्वयक पदी निवड

रूध्दा गावच्या सरपंच वंदना केंद्रे यांची जिल्हा समन्वयक पदी निवड

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील रुद्धा या गावच्या सरपंच वंदना अण्णाराव केंद्रे यांची सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र अंतर्गत लातूर जिल्हा समन्वयकपदी निवड झाली असून, या परिषदेच्या माध्यमातून गावस्तरिय विविध विकास कामे, ग्रामपंचायतीच्या आडिआडचनी तसेच ग्रामपंचायात व सरपंचाचे अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी ही परिषद कार्यरत आहे .

सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष – दत्ता काकडे, उपाध्यक्ष – अनिल गित्ते, प्रदेश महसचिव -विकास जाधव, प्रदेश कोअर कमिटीचे प्रमुख – अविनाश आव्हाड,महिला अध्यक्षा राणी पाटील, उप-अश्विनि थोरात, मराठवाडा समन्वयक – डॉ. प्रल्हाद वाघमारे यांनी निवडीचे पत्र देऊन पूढील कार्यास शुभेच्छा दिल्या. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.

About The Author