एमआयडीसी पोलीस पुन्हा धडाकेबाज! गांजाविक्रेत्यांची स्थिती बिघडलीकी आज!!

एमआयडीसी पोलीस पुन्हा धडाकेबाज! गांजाविक्रेत्यांची स्थिती बिघडलीकी आज!!

लातूर (कैलास साळुंके) : “हाय कंबख्त तूने पी हि नही!” असा एक डाॅयलाॅग नशेच्या अधिन लोक बोलतात. त्यात तथ्य किती हा विषय जरी असला तरी या धंद्यातील पटाईत लोक मी मी म्हणणार्‍यांना गिलासात उतरवत असतात.हे सत्य आहे. लातूरात नशेडी गॅंगची संख्या कमी नाही.त्यासाठी नशा पुरवठा करणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे.

लातूर येथे एमआयडीसी पोलिसांनी गांजा विक्रेत्यांच्या विरोधात कठोर भुमिका घेत,लाखोंचा मुद्येमाल जप्त केला आहे.या संदर्भात पोलीस सुत्राकडून हाती आलेली माहिती अशी की, लातूर येथील पोलीस उपअधिक्षक जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात एमआयडीसी  पोलिस ठाणे येथिल पोलीस अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहिती च्या आधारे पोलिसांनी खाडगाव ते 05 नंबर पाटी जाणारे रिंगरोड वर एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार ज्याचा क्रमांक एम.एच.24 ए.एफ. 2095 असा आहे. ती कार येताना दिसली, सापळा मधील अधिकारी व अंमलदार यांनी सदरची कार थांबवून त्या कारची झडती घेतली असता त्या कारच्या  डिक्की मध्ये संशयास्पद वस्तु आढळुन आल्या! त्याची  पंचा समक्ष झडती घेतली त्या मध्ये प्लास्टिकच्या 43 पिशव्या ज्यामध्ये तब्बल 94.6 किलोग्राम इतक्या वजनाच्या हिरव्या रंगाचा बीमिश्रित गांजा आढळून आला.ज्याची बाजारातील अंदाजे किंमत अकरा हजार रूपये प्रती किलो ग्रहीत धरल्यास ऐकुण आढळुन आलेला गांजा जवळपास चौदा लाख रूपांच्या जवळपासचा आहे! या प्रकरणी वैभव रानबा उजगरे,( वय-22 वर्ष) व्यवसाय-ड्रायव्हर राहणार-खाडगाव रोड, लातूर. मनोज शेषराव जोगेश्वरी, ( वय-20 वर्ष) राहणार-सारोळा रोड, कुष्ठधाम, लातूर. प्रेमनाथ चंद्रकांत शिंदे, (वय 20 वर्ष) राहणार भारत, सोसायटी गवळी नगर, लातूर हे असुन त्यांनी  तपासा दरम्यान स्वतःच्या फायद्यासाठी प्रतिबंधित गांजाची वाहतूक करीत असले बाबत सांगितले आहे. 

    त्यावरून एम आयडी सी पोलीस ठाणे  येथे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे फिर्याद वरून गुन्हा रजिस्टर क्रमांक 346/2021 कलम एन.डी.अॅक्ट 20 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या गुन्ह्यात तीनही आरोपीताना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी जप्त केलेला गांजा व ज्या कार मधून गांजाची वाहतूक करण्यात येत होती, ती कार असा एकूण 14 लाख 86 हजार 730 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश कदम हे करीत आहेत. सदर पथकात  पोलीस उपनिरीक्षक गणेश कदम, संदीप कराड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जगताप, मुन्ना मदने, पोलीस अंमलदार सलगर, जाधव, बावणे, शेख, गिरी यांचा समावेश होता.सर्वसामान्य जनता पोलिसांच्या कर्तबगारीचे कौतुक करत आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!