लामजना पाटी येथे मृत्यूंजय दुत यांना मार्गदर्शन
औसा (प्रशांत नेटके) : पोलीस महासंचालक सो.वाहतूक यांच्या आदेशाने महामार्गावरील अपघाताचे प्रमाण कमी व्हावेत या उद्देशाने पोलीस अधीक्षक सो महामार्ग प्रादेशिक विभाग, औरंगाबाद श्रीमती जमादार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, नांदेड विभाग श्री केंद्रे साहेब यांचे सुचने प्रमाणे दि.२ जून २०२१ रोजी NH 548( B) औसा रोड ते लामजना पाटी शिवाजी चौक या ठिकाणी म.पो. केंद्र,लातूर यांचे वतीने मृत्युंजय दुत यांची बैठक घेण्यात आली. यावेळी अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करण्याबाबत प्रबोधन करण्यात आले होते. यावेळी Asi उळागड्डे, पो. हा. गिरी पो. ना. जकताप, पो. ना. चव्हाण पो.अंमलदार pc सगर pc दुधभाते, बैठकीस एस. एस. सगर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी दिलीप माने, दयानंद शिंदे, धनाजी साळूंके, अतुल शिंदे, गाडेकर दत्ता, रतन शिंदे, बालाजी बिराजदार, शिवकुमार बिराजदार, रामदास गोडबोले, सखीब भोसके, अमोल दुधभाते, बापू सगर, किशोर पांचाळ उपस्थित होते. तसेच किल्लारी पोलीस स्टेशनचे लामजना बीट अंमलदार उस्तुर्गे व महामार्ग कर्मचारी उपस्थित होते.