बालाघाट तंत्रनिकेतन मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी

बालाघाट तंत्रनिकेतन मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : बालाघाट तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जयंतीनिमित्त संस्थेचे संचालक कुलदीप हाके व संचालिका शिवालीकाताई हाके यांच्या हस्ते अहिल्यादेवीच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
जगात पुण्यश्लोक या उपाधीने केवळ सातच लोकांना गौरविले आहे, त्यातील एक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. प्रजेच्या प्रेमावर व सहकाऱ्यांच्या जोरावर एक शक्तीशाली, जनकल्याणकारी राज्य निर्माण केलं. अहिल्यादेवींनी आपल्या खाजगीतून हिंदू देव-देवतांची मंदिरे बांधली, जीर्णोद्धार केला. तसेच मुस्लिमांच्याही मशिदी, दर्गे, पाद्री, ख्रिश्चनांचे गिरीजघर बांधून दिले. जमलेला संपूर्ण महसूल जनतेसाठी व जनतेच्या कल्याणासाठी, विविध योजनांसाठीत्या खर्च करायच्या. स्वतःसाठी एक कवडीही घ्यायच्या नाहीत असे कुलदीप हाके म्हणले.

अहिल्यादेवीच्या राज्यात दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला होता. प्रजा परेशान होती. उपाय काही सुचत नव्हता. प्रजेचे परेशान चेहरे पाहून अहिल्यादेवीनी दरोडेखोरांचा जो कोणी बंदोबस्त करील त्याच्याशी माझी मुलगी मुक्ता हिचा विवाह लावला जाईल अशी राज्यभर व राज्याबाहेरही दवंडी दिली, आणि दरोडेखोरांचा बंदोबस करणाऱ्या भिल्ल यशवंतराव फणसे यांच्याबरोबर आपली मुलगी मुक्ताचा विवाह केला. अशी ही प्रजेसाठी पोटच्या गोळ्याला पणाला लावणारी राज्यकर्ती जगात झालेली नाही. असे शिवालीकाताई म्हणाल्या. यावेळी श्री सिद्धेश्वर मासुळे, श्री विजय कुलकर्णी, श्री बालाजी देवकते, श्री केशव तोंडारे, व सतीश केंद्रे आदी उपस्थित होते.

About The Author