म्युकरमायकोसिस आजाराने ग्रस्त रुग्णाच्या उपचारांसाठी पालकमंञी ना.धनंजय मुंडे यांनी केली एक लाख रुपयांची मदत

म्युकरमायकोसिस आजाराने ग्रस्त रुग्णाच्या उपचारांसाठी पालकमंञी ना.धनंजय मुंडे यांनी केली एक लाख रुपयांची मदत

परळी (गोविंद काळे) : कोरोना काळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी सेवाधर्म या उपक्रमाच्या माध्यमातून परळी मतदारसंघात सेवेचा यज्ञ सुरू केलेल्या सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंञी ना.धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघातील मांडवा येथील रहिवासी मधुकर प्रभाकर फड यांना वैद्यकीय उपचारांसाठी एक लाख रुपयांची मदत त्यांच्या नाथ प्रतिष्ठानच्या वतिने केली आहे. मधुकर फड हे कोरोना पँझेटिव्ह होते यातच त्यांना म्युकर मायकोसिस या जीवघेण्या आजाराने ग्रस्त असून, ते सध्या लातूर येथील आस्था हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत त्यांनी न.प.गटनेते वाल्मिक आण्णा कराड यांची भेट घेऊन मदत करण्याची विनंती केली होती.

म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या भयावह आजारावर होणार खर्च खूप मोठा असून, पालकमंञी ना.धनंजय मुंडे यांच्या मार्फत मिळालेल्या या आर्थिक मदतीमुळे आम्हाला निश्चितच मोठा आधार मिळाला आहे, असे यावेळी मधुकर फड यांचे वडील प्रभाकर फड म्हणाले. न.प. गटनेते वाल्मिक आण्णा कराड यांच्या हस्ते एक लाख रुपये मदत सुपूर्द करण्यात आली.

About The Author