संत ज्ञानेश्वर विद्यालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती व जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त ऑनलाईन भाषण स्पर्धा व रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे जीवन कार्य व तंबाखूचे दुष्परिणाम या विषयावरील भाषण स्पर्धेत व रांगोळी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
त्यामध्ये प्रथम-अनुश्री डुब्बेवार, किमया माने,प्रांजल मुसणे,द्वितीय- संस्कृती कदम,नेहा गायकवाड, अनुष्का हांडे तर तृतीय-कार्तिक कांबळे, श्रुती चंदे,वेद ब्यागलवार, अपूर्वा मोघे, राधिका मध्येवाड, मिथिला केंद्रे या विद्यार्थ्यांनी यश मिळवलं आहे.त्यांना बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. विद्यालयात लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक आशा रोडगे, मुख्याध्यापक उध्दव श्रृंगारे सह मीना तोवर, भास्कर दिंडे,उमेश फुलारी, तुकाराम कदम, माधव बोडके उपस्थित होते. स्वाभिमानी, बाणेदार, आदर्श राज्यकर्त्या, लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या मुलींना शिक्षण, महिलांना सैनिकी शिक्षण, हुंडाबंदी, दारूबंदी, झाडे तोडण्यास बंदी अशा महान कार्यातून त्यांचं बुध्दीवैभव आणि दूरदृष्टी दिसून येते असे मत विद्यार्थ्यांनी ऑनलाईन भाषण स्पर्धेत व्यक्त केले आहेत.