उमरगा कोर्ट, धसवाडी, टाकळगावला प्राथमिक उप-आरोग्य केंद्र होणार – आमदार बाबासाहेब पाटील
उमरगा यल्लादेवी ला देखील उपकेंद्र मंजूर करणार
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील उमरगा कोर्ट, टाकळगाव व धसवाडी येथे प्राथमिक उपआरोग्य केंद्र लवकरच होणार असून उमरगा यल्लादेवी येथील नागरिकांवर अन्याय होवू देणार नाही तेथे पण उपकेंद्राकरिता शिफारस करणार असल्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी पोलीस फ्लॅश प्रतिनिधीशी बोलतांना सांगीतले. महाराष्ट्र शासनाच्या वतीने ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या सेवा पुरवण्यासाठी ,प्राथमिक आरोग्य केंद्रापासून सहा किमी पेक्षा जास्त अंतर व पाच हजार लोकसंख्या पेक्षा आधिक लोकसंख्या असलेल्या गावात लोकसंख्या व प्राथमिक आरोग्य केंद्रापासूनचे अंतर याची अट ठेवून उपकेंद्रांस मंजूरी दिली जाते. सन २०११ च्या जनगणनेनुसार टाकळगाव लोकसंख्या ५२६९ आरोग्य केंद्राचे आंतर सहा किमी हे दोन्ही अटीत बसते तर, उमरगा कोर्ट ४२९७ लोकसंख्या तर आंतर सात किमी,धसवाडी ३९६४ आंतर सात किमी आंतराच्या अटीत बसत असल्याने आमदार बाबासाहेब पाटील यांच्या दि.२ फेब्रुवारी २०२१ च्या शिफारस पत्रानुसार विशेष खास बाब म्हणुन सहसंचालक विजय पी.कंदेवाड यांनी प्राथमिक उपआरोग्य केंद्र महाराष्ट्र शासनाचे पत्र क्र.संआसे/कक्ष-७अ/ टे -८ १९६७/२०२१ उपकेंद्र लातूर यांना पत्र देवून उपकेंद्र स्थापन करण्याविषयी पुढील बाबींची पुर्तता करण्याकरिता पत्र देण्यात आल्याची माहीती आ.पाटील यांनी दिली. उमरगा यल्लादेवी येथील नागरिकांवर अन्याय होवू देणार नाही.
उमरगा यल्लादेवी येथे आरोग्य केंद्र व्हावे म्हणुन उमरगा यल्लादेवी येथील ग्रामस्थांची जुनी मागणी असल्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांना चेअरमन राजकुमार सोमवंशी यांनी सांगीतली असता आ.पाटील यांनी उमरगा यल्लादेवीला उपकेंद्र होण्यासाठी लवकरच शिफारस करुन मान्यता मिळवून देतो अशा प्रकारचे आश्वासन आमदार पाटील यांनी चेअरमन सोमवंशी यांना दिले.